Ratnagiri District Central Co-Operative Bank : कोकणाला आर्थिक दिशा देणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

Ratnagiri DCC Bank : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दोन विस्तार कक्षांसह ७७ शाखा आहेत. १९ शाखांमध्ये एटीएम सेंटर असून दुर्गम भागातील नऊ तालुक्यांसाठी तीन एटीएम मोबाईल व्हॅन आहेत. बँकेने ऑनलाइन बँकींगपर्यंत मजल मारली आहे. विविध पुरस्कारांनी बॅंकेचा गौरव झालेला आहे.
Ratnagiri DCC Bank
Ratnagiri DCC Bank Agrowon
Published on
Updated on

Ratnagiri District Bank : रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेची २४ मे १९५७ मध्ये स्थापन झाली. मात्र १९८३ मध्ये विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेची स्वतंत्र नोंदणी झाली. यामुळे रत्नागिरी जिल्हा बँकेची स्वतंत्र वाटचाल सुरु झाली. आर्थिक शिस्त पाळून बँकेने राज्यात लौकिक मिळवला. याचे श्रेय बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे आणि संचालक मंडळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी वर्गाला जाते.

शुन्यातून वाटचाल

बॅंकेकडे १९८३ साली १४ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. अकरा कोटी रुपयांचे कर्जे वाटप होते. याचकाळात ग्रामीण भागात सहकार चळवळ रुजत होती. पीक कर्ज, विहीर खोदाई, पाणीपुरवठा योजना, शेतीपूरक उद्योगांना कर्ज वाटप होऊ लागले. संपूर्ण जिल्ह्यात शाखांसह कार्यक्षेत्र विस्तारले. १९९३ नंतर उदारीकरणाचा सहकारावर परिणाम होऊ लागले.

नरसिंहम कमिटीच्या वतीने शिफारस केलेले सुधारित निकष सहकारी बॅंकांना १९९९ पासून लागू झाल्याने सुधारणांना गती मिळाली. आर्थिक शिस्तीचा आग्रह वाढला. प्रुडेंशियल नॉर्म तसेच सीडी रेशो, एनपीए, सीआरएआर, सीआरआर निकष लागू झाले. २००३-०४ मध्ये बँकेचा तोटा अकरा कोटी होता. ढोबळ एनपीएचे प्रमाण ६४ टक्के होते.

अल्पशा ठेवी व कर्जव्यवहार, वाढत्या खर्चामुळे बँक अडचणीत होती. यास्थितीत २००६-०७ मध्ये कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्याकडे बँकेची धुरा आली. डॉ. चोरगे यांनी तीन वर्षांत बँकेला शिस्त लावली. २००८-०९ मध्ये सभासदांना लाभांश देत बँक संकटाबाहेर काढली.

२०१२-१३ पासून सतत अकरा वर्षे नक्त एनपीएचे प्रमाण शून्य टक्के आहे.२०२२- २३ मध्ये बँकेचे ढोबळ एनपीएचे प्रमाण २.१० टक्के आहे. सतत बारा वर्षे लेखापरिक्षणाचा ‘अ’ दर्जा आहे. बँकेच्या दोन विस्तार कक्षांसह ७७ शाखा आहेत. बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या चार मजली सुसज्ज इमारतीसह तालुक्यातील २३ शाखा स्वमालकीच्या जागेत आहेत.

Ratnagiri DCC Bank
District Bank Proposal : उद्दिष्ट कमी करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रस्ताव

आधुनिकीकरणाकडे झेप

१९ शाखांमध्ये एटीएम सेंटर आहे. नाबार्डच्या मदतीने दुर्गम भागातील नऊ तालुक्यांसाठी तीन एटीएम मोबाईल व्हॅन आहेत. बँकेतर्फे एटीएम, मोबाईल बँकिंग, युपीआय, डिजिटल पेमेंट, यासह RTGS, NEFT, ATMRupay Card, SMS Alert, POS Transaction, E. Com,Cibil Report, Missed Call Alert, Card Safe, CTS, IMPS, QR Code, ७/१२ उतारा काढणे अशा अनेक सुविधा ग्राहकांना दिल्या आहेत. सायरन सिस्टीम, सीसीटीव्ही, अग्निशामक यंत्रणा, सुरक्षा रक्षक व्यवस्था आहे. बँकेचे स्वतंत्र संकेतस्थळ आहे.

गुणात्मक सुविधा

शेतकरी मेळावा, शेती संस्थांचे सचिव, अध्यक्षांची सहकार सहल, खासगी सचिवांना दरमहा १,५०० ते ५,००० पर्यंत मानधन, विविध कार्यकारी संस्थांना संगणक प्रणाली, प्राथमिक शेती सहकारी संस्थांना इमारत / फर्निचरसाठी एक लाखांचे अनुदान, अशा गुणात्मक सेवा बँकेने दिल्या आहेत. नऊ तालुक्यात आर्थिक साक्षरता केंद्रांची उभारणी केली आहे.

ग्रुप अपघात विमा योजनेतून पगारदार बचत खातेदारांना मासिक वेतनाच्या १०० पट किंवा ३० लाख विमा संरक्षण दिले जाते, त्याचा हप्ता बँक भरते. जुलै २०२० मध्ये आलेल्या महापुरातील आपद्ग्रस्तांना बँकेने सवलतीत पाच टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला होता. बँकेची कर्जवसुलीची सक्षम व्यवस्था आहे.

कर्ज वसुलीचे प्रमाण ९७ टक्के आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात सहाय्यक सरव्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र वसुली विभाग आहे. तालुकास्तरीय समितीकडून ठेवी, कर्ज, लक्षांक पूर्तता व वसुलीचा स्वतः अध्यक्ष दरमहा आढावा घेतात.

कॉन्टीन्जंट निधीतील उपक्रम

तिवरे धरण फुटल्याने आपद्ग्रस्तांना बँकेतर्फे पुनर्वसनासाठी २१ लाखांची पाच पोर्टेबल हाऊस. घरे,शेती वाहून गेलेल्या २२ आपद्ग्रस्तांची प्राथमिक शेती संस्थांकडील ३.३२ लाखांची शेती कर्जे माफ.

कोरोना संक्रमण कालावधीत जिल्हा शासकीय रुग्णालयास व्हेंटीलेटर्ससाठी १३.३६ लाखांची मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २५ लाख, जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीस २५ लाखांची मदत. जिल्हा परिषदेमध्ये नियंत्रण कक्ष उभारण्यासाठी ९.९२ लाखांची मदत.

कोरोनामुळे बँकेचे मयत कर्मचारी व विकास संस्थेच्या मयत सचिवांच्या वारसांना अनुक्रमे ५ लाख आणि २ लाखांच्या मदतीची योजना. त्याअंतर्गत बॅंकेच्या दोन तर संस्थेच्या एका सचिवाच्या वारसाला आर्थिक मदत.

जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाकरिता ५ लाखांचा निधी.

संजय जाधव (ता. संगमेश्वर) यांचा गोठा जळून जनावरे मृत्युमुखी पडल्यामुळे एक लाख रुपये मदत.श्रीमती मोनिका घाग (रा. फौजदारवाडी, खरवते, ता. चिपळूण) यांना "मिक्स मार्शल आर्ट" या जागतिक स्पर्धेसाठी ५०,००० रुपये मदत.

कै.ना.प.अभ्यंकर निरिक्षण बालगृहासाठी ५०,००० रुपयांची मदत.

सकाळ माध्यम समुहाच्या महाकॉनक्लेव्ह-२०२३ मध्ये सहभाग.

आर्ट सर्कल संस्थेसाठी भरीव सहकार्य.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इमारतीस लिफ्टसाठी ११ लाख २७ हजार २६७ हजारांचे अर्थसाहाय्य.

कोकणबाग ॲग्रो टुरिझम फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीस (रायपाटण ता.राजापूर) ५० हजार, सुवर्णसूर्य फाऊंडेशनच्या ‘सायक्लिस्ट क्लब'च्या रोलर कोस्टल सायक्लोथॉनसाठी २५ हजारांची मदत.

Ratnagiri DCC Bank
District Co-Operative Bank : नियमित कर्ज फेडा; शून्य टक्के व्याजाचा लाभ घ्या

पुरस्कारांची मोहर

नाबार्ड फॅसिलिटेड सीबीएस प्रोग्रॅम पुरस्कार २०१२.

सहकारी बँक असोसिएशनचा तंत्रज्ञान प्रसार, उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी, उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार.

महाराष्ट्र शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कार (१५-१६), सहकार भूषण (१७-१८).

बँकिंग फाँटियर्स पुरस्कार : बेस्ट एचआर प्रॅक्टीस व बेस्ट डिजिटल मार्केटिंग (२०१६-१७), बेस्ट चेअरमन व बेस्ट क्रेडीट ग्रोथ (२०१७-१८), बेस्ट प्रॉडक्ट इनोव्हेशन (२०१८-२०१९).

बँको पुरस्कार : उत्कृष्ट सहकारी बँकिंग(२०१६-१७), बँको ब्लू रिबन २०१८-१९, २०१९-१९२० चे मानकरी.

लार्ज डीसीसीबी कॅटेगरी, बेस्ट इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह इन सहकारी बँकिंग.

फाँटियर्स इन को-ऑप बँक ॲवॉर्ड, बेस्ट एचआर इनोव्हेशन (२०२१), लिडरशीप ॲवॉर्ड आयटी हेड ऑफ द इअर (२०२२)

इंटलेक्चुअल पीपल्स फाउंडेशन, दिल्ली -२०२२ बेस्ट चेअरमन परफॉर्मन्स अॅवार्ड.

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई पुरस्कार २०२२.

कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार.

रत्नागिरी जिल्हा बँकेची आर्थिक शिस्त, राजकारण निरपेक्ष दृष्टिकोन आणि शेवटच्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून रत्नागिरी जिल्हा बँकेच्या धोरणाची आखणी केली जाते. कोकणातील शेतकरी, मच्छीमारांच्या जीवनात आमूलाग्र बदल हेच बँकेचे अंतिम ध्येय आहे.
डॉ. तानाजीराव चोरगे, अध्यक्ष
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे आणि सर्व संचालकांच्या मदतीने मे २००७ मध्ये बँकेची धुरा स्वीकारली.आज बॅंकेच्या ठेवी २,४१० कोटी, कर्जे १,६६२ कोटी, एनपीए शून्य टक्के, ढोबळ नफा ४७.३३ कोटी झाला आहे.
अजय चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com