Water Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation : पालखेडच्या वितरिकांना ‘टेल टू हेड’ पाणी देणार

Agriculture Irrigation : एक महिन्यापासून पालखेड कालव्यास पूरपाणी सुरू असून पश्चिम विभागातील चाऱ्यांना अत्यल्प पाणी सोडण्यात येऊन पाणी बंद केल्याने परिसरात जनावरांसह वाडी वस्तीवरील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Team Agrowon

Yeola : पाटपाणी वितरणात योग्य नियोजनाअभावी वर्षानुवर्षे अन्याय होत असल्याने प्रहार संघटनेचे पालखेड पाटबंधारे विभागाच्या एरंडगाव शाखा कार्यालय आवारात सोमवारपासून (ता. ९) उपोषण सुरू केले होते. मात्र न्याय मिळत नसल्याने अखेर आत्मदहनाचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला होता.

त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. वितरकांची देखभाल, दुरुस्तीची कामे पुढील आवर्तनापूर्वी करण्यात येतील, पुढील आवर्तनात वितरिकांना ‘टेल टू हेड’ पाणीपुरवठा करण्यात येईल यांसह इतर मागण्यांप्रश्नी लेखी आश्वासन मिळाल्याने तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले.

येवला तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने अद्याप पिण्यासाठीदेखील विहिरींना पाणी नाही. सध्या एक महिन्यापासून पालखेड कालव्यास पूरपाणी सुरू असून पश्चिम विभागातील चाऱ्यांना अत्यल्प पाणी सोडण्यात येऊन पाणी बंद केल्याने परिसरात जनावरांसह वाडी वस्तीवरील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने त्वरित पाणी सोडणे आवश्यक असल्याची मागणी होती.

परिसरातील शेतकऱ्यांना पाणी वाटपात अन्याय होत असल्याने हे आंदोलन करण्यात आले. उपोषणकर्त्यांची परिस्थिती खालावत असल्याने त्याची दखल घेऊन बुधवारी (ता. ११) सायंकाळी पाचला पालखेड डावा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी लेखी अश्वासन दिले. या वेळी शिवसेनेचे (उबाठा गट) जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. या वेळी उपविभागीय अधिकारी एस. एस. पाटील, शाखाधिकारी अमोल सुरडकर व श्रीमती सरवदे आदी उपस्थित होते.

एक महिन्यापासून कालव्यास पूरपाणी सुरू असून, त्याद्वारे तालुक्यातील वितरिकांना समप्रमाणात पाणी सोडणे अपेक्षित असताना, अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष कारून उघडउघड अन्याय केला. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने पाणीवाटप होत असल्याने अखेर उपोषणाचा मार्ग पत्करला होता.

दोन दिवस उपोषण करूनही दखल न घेतल्याने तिसऱ्या दिवशी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडून सूत्रे फिरू लागली. राज्य दिव्यांग कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू व त्यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने कार्यकारी अभियंता भागवत यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत मागण्या समजून घेतल्या व त्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT