Irrigation Water : पाणी समस्यायुक्त कसे बनते?

Crop Irrigation : ओलीतासाठी अयोग्य असणारे हे समस्यायुक्त पाणी म्हणजे नेमके कोणते पाणी आणि अशा समस्यायुक्त पाण्याने सतत ओलित केल्यास त्याचे मातीच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात याविषयीची माहिती पाहुया.
 Irrigation Water
Irrigation WaterAgrowon

Irrigation Water Update : पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक असणारे पोषक द्रव्ये पिकाला मातीमधून उपलब्ध होतात. त्यासाठी जमिनीत विशिष्ट आणि योग्य प्रमाणात ओलावा असण आवश्यक असतं.

मातीमध्ये हा ओलावा टिकून राहावा यासाठी माती सोबत पाण्याची सुद्धा तितकीच आवश्यकता असते. म्हणजेच पाण्याशिवाय नुसती माती आणि मातीशिवाय नुसते पाणी हे शेती करण्यासाठी उपयोगाचे नाही. शेती करण्यासाठी माती आणि पाणी हे दोन्ही घटक आवश्यक असतात. 

ओलिताची किंवा बागायती शेती करत असताना गरजेनूसार खरीप (Kharif) आणि रब्बी (Rabbi) किंवा उन्हाळी हंगामात (Summer Season) पिकाला ओलीत करुन उत्पादन घेतले जाते.

पडणाऱ्या पावसाचे प्रमाण खूप कमी असल्यास जमिनीच्या पृष्ठभागावर जमा होणारे क्षार (Salt) घुऊन न जाता ते तसेच साचत राहतात आणि जमिनीच्या भूगर्भात साठणाऱ्या पाण्यात या क्षारांचे प्रमाण वाढून हे भूगर्भातील पाणी सुद्धा क्षारयुक्त किंवा विम्लधर्मी म्हणजेच समस्यायुक्त होत राहते. कालांतराने ते ओलितासाठी अयोग्य होते.

म्हणून ओलीतासाठी अयोग्य असणारे हे समस्यायुक्त पाणी म्हणजे नेमके कोणते पाणी आणि अशा समस्यायुक्त पाण्याने सतत ओलित केल्यास त्याचे मातीच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात याविषयीची माहिती पाहुया. 

समस्यायुक्त पाणी म्हणजे नेमके कोणते पाणी?

भुगर्भात कोणतेच पाणी शुद्ध स्वरुपात उपलब्ध नसते. त्यामध्ये काही प्रमाणात क्षार विरघळलेले असतातच. त्यावरुन ढोबळमानाने ओलिताच्या समस्यायुक्त पाण्याचे दोन प्रकार पडतात. 

 Irrigation Water
Fruit Orchard Water Management : सध्याच्या वातावरणात फळबागांचे पाणी व्यवस्थापन कसे करावे?

१) क्षारयुक्त पाणी

ज्या पाण्यामध्ये कॅल्शिअम आणि मॅन्गेशियम यासारख्या खनिज क्षारांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक वाढलेले असते, त्यावेळी ते पाणी क्षारयुक्त किंवा मचुळ बनते.

अशा क्षारयुक्त पाण्यात लोह व मॅगनीज यांचे सल्फेटस् तसेच सोडियम, कॅल्शियम आणि मॅन्गेशियम यांचे क्लोराईड आणि बायकार्बोनेटस् हे मोठ्या प्रमाणात आढळतात. 

२) विम्लधर्मी पाणी 

विम्लधर्मी पाण्यात लोह व मॅगनीज यांचे सल्फेटस् तसेच सोडियम, कॅल्शियम आणि मॅन्गेशियम यांचे क्लोराईड आणि बायकार्बोनेटस् या विद्राव्य क्षारांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे सोडियमचे बायकार्बोनेटस् या पाण्यात जास्त असतात.

याशिवाय कॅल्शियम आणि मॅन्गेशियम या क्षारांचे सुद्धा कार्बोनेट तयार होतात आणि जमिनीत स्थिर किंवा अचल राहतात.

स्त्रोत ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com