संग्राम चव्हाण, अमृत मोरडे, विजय काकडेEnvironmental Benefits: राज्यभर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड सुरू आहे. अनेकदा रोपे उपलब्ध आहेत म्हणून किंवा एखादी प्रजाती लोकप्रिय झाली आहे म्हणून ती सर्वत्र लावली जाते. प्रत्यक्षात प्रत्येक वृक्षाची स्वतःची पर्यावरणीय गरज असते. त्यामुळे ‘एकच वृक्ष संपूर्ण महाराष्ट्रासाठी’ असा कोणताही नियम नाही. योग्य ठिकाणासाठी योग्य वृक्ष हा यशस्वी वृक्ष लागवडीचा मूलमंत्र आहे..नवीन झाडे लावताना योग्य खड्डा, दर्जेदार रोप, वेळेवर लागवड आणि प्रारंभीची निगा या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र या सर्व गोष्टी योग्य करूनही अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीत अपेक्षित यश देत नाही. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे अयोग्य जागेसाठी अयोग्य वृक्षप्रजातीची निवड. राज्यभर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड सुरू आहे. .Tree Plantation: ‘हरित नाशिक’ उपक्रम लोकचळवळ व्हावी : मंत्री गिरीश महाजन .अनेकदा रोपे उपलब्ध आहेत म्हणून किंवा एखादी प्रजाती लोकप्रिय झाली आहे म्हणून ती सर्वत्र लावली जाते. प्रत्यक्षात प्रत्येक वृक्षाची स्वतःची पर्यावरणीय गरज असते. पर्जन्यमान, तापमान, मातीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, भूआकार, जागेचा उपयोग आणि भविष्यातील वाढ यांचा विचार न करता केलेली वृक्ष लागवड दीर्घकाळ टिकत नाही. कोकणात जो वृक्ष उत्कृष्ट वाढतो तोच मराठवाड्यात यशस्वी होईलच असे नाही. विदर्भातील काळ्या जमिनीसाठी योग्य असलेली प्रजाती सह्याद्रीच्या उतारावर तितकीच चांगली वाढेल असेही नाही..वृक्ष निवडण्यापूर्वी हे प्रश्न विचारावृक्ष लागवड ही २० ते ५० वर्षांची गुंतवणूक असते. त्यामुळे एखादा वृक्ष केवळ उपलब्ध आहे किंवा लोकप्रिय आहे म्हणून त्याची निवड करू नये. वृक्षप्रजातीची निवड ही स्थानिक हवामान, माती, पाण्याची उपलब्धता, जागेचा वापर आणि भविष्यातील उद्देश यांचा विचार करूनच करावी. योग्य प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास योग्य वृक्षप्रजातीची निवड करणे अधिक सोपे आणि शास्त्रशुद्ध ठरते..ही जागा कशासाठी वापरली जाणार आहे? (शेती, रस्त्याकडील लागवड, शाळा, मंदिर, सार्वजनिक उद्यान, गावाचा पार की औद्योगिक परिसर)जमीन खोल, उथळ, मुरमाड, दगडाळ, क्षारयुक्त की पाणथळ आहे?पाणी वर्षभर उपलब्ध आहे का, की लागवड पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे?या भागात सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती आहे आणि हवामान कसे आहे?पूर्ण वाढ झाल्यानंतर या वृक्षाची उंची, पसारा आणि मुळांची वाढ किती असेल? त्यामुळे भविष्यात रस्ते, इमारती, विद्युत वाहिन्या किंवा पिकांना अडचण तर निर्माण होणार नाही ना?.या वृक्षापासून भविष्यात मला नेमका कोणता लाभ अपेक्षित आहे? (लाकूड, फळे, चारा, सावली, कार्बन संचयन, जैवविविधतेचे संवर्धन, मृद् व जलसंवर्धन की सौंदर्यवर्धन)या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळाल्यानंतरच वृक्षप्रजातीची निवड करावी. कारण योग्य जागेसाठी योग्य वृक्ष निवडणे हीच यशस्वी, शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर वृक्ष लागवडीची पहिली पायरी आहे. योग्य वृक्षप्रजातीची निवड ही वृक्ष लागवडीतील सर्वांत महत्त्वाची गुंतवणूक आहे. आजचा निर्णय पुढील अनेक दशकांपर्यंत उत्पादन, उत्पन्न, पर्यावरणीय लाभ आणि जैवविविधतेवर परिणाम करणार असतो. त्यामुळे उपलब्ध रोपांपेक्षा आपल्या गरजा, जागा आणि भविष्यातील उद्देश यानुसार वृक्षांची निवड करणे हेच यशस्वी वृक्ष लागवडीचे खरे सूत्र आहे..समस्याग्रस्त जमिनीसाठी योग्य वृक्षप्रजातींची निवडमहाराष्ट्रातील मोठ्या क्षेत्रावर मृद्धूप, क्षारयुक्तता, पाणथळपणा, दुष्काळ, खडकाळपणा तसेच सेंद्रिय कर्बाची घट यांसारख्या कारणांमुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत आहे. काही भागात अतिसिंचन, अयोग्य निचरा, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, तर काही ठिकाणी उतारावरील शेती, जंगलतोड आणि हवामान बदलामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. अशा जमिनी पारंपरिक शेतीसाठी कमी उपयुक्त ठरत असल्या तरी त्या योग्य वृक्षप्रजातींच्या माध्यमातून पुन्हा उत्पादक आणि पर्यावरणदृष्ट्या समृद्ध बनविता येतात..योग्य वृक्षप्रजातींची लागवड केल्यास केवळ जमिनीचे पुनर्वसन होत नाही, तर जमिनीची धूप कमी होते, क्षार कमी होण्यास मदत होते, भूजल पुनर्भरण सुधारते, सेंद्रिय कर्ब वाढतो आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोतही उपलब्ध होतात. त्यामुळे समस्याग्रस्त जमिनींवर वृक्ष लागवड हा केवळ पर्यावरणीय नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही अत्यंत परिणामकारक पर्याय ठरतो..समस्याग्रस्त जमिनींमध्ये लागवडीचे तंत्रसमस्याग्रस्त जमिनींमध्ये केवळ योग्य वृक्षप्रजातींची निवड पुरेशी नसून, त्या जमिनीच्या प्रकारानुसार योग्य लागवड तंत्र, जलसंधारण, मृदासुधारणा आणि प्रारंभीची निगा या बाबी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. योग्य प्रजाती, योग्य तंत्र आणि योग्य व्यवस्थापन यांचा समन्वय साधल्यास अशा जमिनी उत्पादनक्षम, पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर बनू शकतात..Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प.जलधूपग्रस्त जमीनसमपातळी चर, सलग समतल चर, स्टॅगर्ड कंटूर ट्रेंच, अर्धचंद्राकृती चर किंवा कंटूर बंड तयार करून चराच्या खालच्या बाजूस लागवड करावी.उथळ व खडकाळ जमीनरॉक ऑगर किंवा आवश्यकतेनुसार नियंत्रित ब्लास्टिंगद्वारे खड्डे तयार करून त्यामध्ये सुपीक माती, १० ते २० किलो कुजलेले शेणखत, ५० ते १०० ग्रॅम रॉक फॉस्फेट, जैविक खते व आवश्यकतेनुसार मृदासुधारक भरावेत..दुष्काळप्रवण / कोरडवाहू जमीनखोल खड्डे (६०–९० सेमी), सूक्ष्म जलसंधारण, अर्धचंद्राकृती चर, मल्चिंग आणि प्रारंभी ठिबक सिंचनाचा वापर करावा.क्षारयुक्त जमीन३० ते ४५ सेमी उंच वाफे किंवा ४५ ते ६० सेंमी उंच मातीचे भराव तयार करून लागवड करावी. चांगला निचरा, सेंद्रिय खतांचा वापर, आवश्यकतेनुसार लिचिंग करावे. उपलब्ध असल्यास १ ते २ किलो ग्लिरिसिडीयाची हिरवी पाने खड्ड्यात मिसळावीत..अल्कधर्मी जमीनमृदा परीक्षणानुसार खड्ड्यामागे साधारण १ ते २ किलो जिप्सम वापरून उंच वाफ्यांवर लागवड करावी. सेंद्रिय व हिरवळीच्या खतांसह प्रभावी निचरा राखावा.पाणथळ जमीन३० ते ६० सेमी उंच बांध, गादी वाफ्यावर लागवड करून निचरा चर ठेवावेत..गाळाची (नदीकाठची) जमीनपूरप्रवण भागात ३० ते ४५ सेंमी उंच वाफ्यांवर लागवड करावी. आवश्यकतेनुसार बहुपंक्तीय संरक्षण पट्टे विकसित करावेत.मुरमाड जमीनमोठे खड्डे घेऊन त्यामध्ये १५ ते २० किलो कुजलेले शेणखत, जैविक खते व मृदासुधारक मिसळावेत. जलसंधारण आणि मल्चिंगचा अवलंब करावा..खनिज उत्खननानंतरची / निकृष्ट जमीनमोठ्या आकाराचे खड्डे (किमान १ × १ × १ मी.) घेऊन त्यामध्ये सुपीक माती, २० ते २५ किलो कंपोस्ट/शेणखत, जैविक खते व मायकोरायझा वापरावा. प्रारंभी २ ते ३ वर्षे संरक्षण, सिंचन व तण नियंत्रणावर भर द्यावा.- संग्राम चव्हाण ९८८९०३८८८७(वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.