Weather Forecast Jalna: जालना जिल्ह्यातील स्वयंचलित हवामान केंद्रांशी छेडछाड झाल्याच्या घटनांची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. छेडछाड करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत..यासंदर्भात सोमवारी (ता. २०) जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी तसेच स्कायमेट कंपनीच्या प्रतिनिधींची ऑनलाइन बैठक झाली. बैठकीस पोलिस अधीक्षकही उपस्थित होते.Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली.जालना जिल्ह्यात कार्यरत असलेल्या काही स्वयंचलित हवामान केंद्रांवर अज्ञात व्यक्तींनी छेडछाड केल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, अशा प्रकारामुळे हवामानविषयक माहितीच्या अचूकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्वयंचलित हवामान केंद्रांमधून तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा आदी महत्त्वपूर्ण हवामानविषयक माहिती संकलित केली जाते..El Nino Crop Planning: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पीक नियोजनावर भर द्या.या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना हवामानावर आधारित कृषी सल्ला देण्यासाठी, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केला जातो. त्यामुळे या केंद्रांशी कोणत्याही प्रकारची तोडफोड अथवा छेडछाड करणे हे सार्वजनिक हिताला बाधा पोहोचविणारे कृत्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले..जिल्ह्यातील सर्व नागरिक, शेतकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आपल्या परिसरातील स्वयंचलित हवामान केंद्रांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे. कोणतीही संशयास्पद हालचाल, उपकरणांची तोडफोड अथवा छेडछाड आढळल्यास तात्काळ संबंधित तहसील कार्यालय, कृषी विभाग, पोलिस प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.