Chia Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Indra Malo : यंत्रणांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी : मालो

Team Agrowon

Washim News : ‘‘जिल्ह्याचे मागासलेपण ओळखून केंद्राने आकांक्षित म्हणून जिल्ह्याची निवड केली आहे. मागासलेपण दूर करण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजनातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. शेवटच्या माणसाचे उत्पन्न वाढले पाहिजे, या साठी प्रयत्न करावेत,’’ असे निर्देश केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सहसचिव इंद्रा मालो यांनी दिले.

सोमवारी (ता. २९) जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात विविध यंत्रणांकडून आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचा आढावा घेताना मालो बोलत होत्या. या वेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे उपस्थित होते.

मालो म्हणाल्या, ‘‘विविध योजनांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या निधीचा उपयोग करून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा. किशोरवयीन मुलींसाठी बालविकास प्रकल्पाद्वारे विविध उपक्रम राबवावेत. कोणतीही मुलगी शाळाबाह्य नसावी. शाळांमध्ये स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व स्वच्छता असावी. शिक्षकांची क्षमता बांधणी करावी. जलजीवन मिशन योजनेतून शाळा, ’’

बुवनेश्वरी म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यात पाऊस कमी पडतो. पावसाचे पाणी वाहून जाते. जिल्ह्यात सिंचन प्रकल्प उभारण्यास वाव नाही. त्यामुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून १२ हजार विहिरी तयार करण्याचे नियोजन आहे. ६ हजार विहिरींना मान्यता दिली आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना फळबाग योजनेचा लाभ देण्यात येईल. शेतकरी उत्पादक कंपन्या काम करीत आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.’’

पंत म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायती सोडून सर्व ग्रामपंचायतींना फोरजी इंटरनेट सुविधा दिली आहे. आरोग्य विभाग दक्ष राहून काम करीत आहे. बालके कुपोषणाच्या श्रेणीतून सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी काम सुरू आहे.’’

‘एक हजार एकरावर चिया पीक’

‘‘जिल्ह्यात यावर्षी पहिल्यांदा एक हजार एकरावर चिया पिकाची लागवड केली आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठे उत्पादन होत असल्याने त्यावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी लक्ष देण्यात येत आहे,’’ असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. शाह यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT