Crop Insurance 2026 : मुख्यमंत्री फडणवीसांकडे कृषिमंत्री भरणे यांनी काय मागणी केली?

शेतातलं पीक उभं आहे... पण पाऊस नसल्याने वाळून गेलंय. अनेक ठिकाणी तर पिकांचा पालापाचोळा झालाय. एक-दोन दिवस नाही, तर कुठे २०, कुठे ३०, तर कुठे तब्बल ३८ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांमधील ८३ तालुके या पावसाच्या ओढीने अडचणीत आले आहेत. पिकं अजून शेतात दिसतय, पण पाऊस आणखी लांबला तर उरली सुरली पिकं खाक होण्याची परिस्थिती निर्माण ओढावू शकते आणि त्यामुळे आता कृषिमंत्र्यांनी पीकविमा कंपन्यांना पीक शेतात असतानाच पंचनामे आणि पीक कापणी प्रयोग करा, अशी मागणी केली आहे. कारण पीकच हातात राहिलं नाही, तर नंतर पंचनामा कसा होणार? आणि नुकसानभरपाई कशी ठरणार? याच मुद्द्यावर आता सरकारनेही कंपन्यांना तातडीचे निर्देश देण्याची तयारी केली आहे. तर कृषिमंत्र्यांना समोर सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात नेमकी कुठे किती दिवस पावसाने दडी मारली आहे, पिकांची परिस्थिती किती गंभीर आहे आणि शेतकऱ्यांच्या पीकविम्याबाबत सरकारने काय भूमिका घेतली आहे, जाणून घेऊया या व्हिडीओमधून
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com