Chia Cultivation
Chia CultivationAgrowon

Chia Seeds : वाशीम जिल्ह्यात चिया सीडची हजार एकरावर होणार लागवड

Chia Cultivation in Washim : वाशीम जिल्ह्यात चिया सीडची हजार एकरावर होणार लागवड
Published on

Washim News : रब्बी हंगामात पारंपरिक गहू, हरभरा या पिकांना पर्याय म्हणून शेतकरी दरवर्षी नवनवीन पिकांचा शोध घेत असतात. जिल्ह्यात मागील दोन-तीन हंगामांपासून चिया सीड लागवडीचे प्रयोग सुरू होते.

यंदा हे क्षेत्र तब्बल एक हजार एकरापर्यंत नेले जात आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने पिकवले जाणारे सुमारे ४०० एकरांतील चिया सीड हे पुण्यातील एका कंपनीमार्फत १४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्याबाबतचा करारसुद्धा प्रशासनाच्या पुढाकाराने झाला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाशीमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस. यांनी चिया सीड लागवडीच्या दृष्टीने कृषी विभाग व आत्मा यंत्रणेला नियोजनाबाबत सातत्याने मार्गदर्शन केले. या लागवडीच्या दृष्टीने अनेक बैठका घेण्यात आल्या.

सोबतच शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनसुद्धा देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले. यातूनच यंदा जिल्ह्यात चिया सीडची हजार एकरावर लागवड होत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी दिली.

Chia Cultivation
Chia Cultivation : वसमत तालुक्यात होतेय चिया पिकाची लागवड

सेंद्रिय चिया सीडला दर चांगले

जिल्ह्यात डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनअंतर्गत गेल्या तीन-चार वर्षांपासून सेंद्रीय पद्धतीने उत्पादन काढण्यासाठी शेतकरी गट, कंपन्या कार्यरत झालेल्या आहेत. याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून ४०० एकरांवर सेंद्रीय पद्धतीने चिया सीडचे उत्पादन घेतले जाणार आहे. काही शेतकऱ्यांनी लागवडही सुरू केली. या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेमार्फत बियाण्यासाठी मदत दिली जात आहे. तसेच प्रशिक्षणेही घेतली जातील.

चिया सीड उत्पादनाचा प्रयोग शेतकरी व कंपनीसाठी चांगला आहे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित होणारे चिया सीड हे १४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकत घेतले जाईल.
- प्रशांत मोराणकर, समृद्धी आॅरगॅनिक फार्म्स, पुणे
‘आत्मा’मार्फत चिया बियाणे व लागवड, व्यवस्थापनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करीत आहोत. यासाठी रब्बीत प्रात्यक्षिके व शेती शाळांचे नियोजन करण्यात आले आहे.
-अनिसा महाबळे, प्रकल्प संचालक
शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांऐवजी नवीन पीक पद्धतीतून दोन पैसे अधिक मिळावेत या उद्देशाने जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस. यांच्या मार्गदर्शनात चिया सीड लागवडीला प्रोत्साहन देत आहोत. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केले जाणारे चिया सीड १४ हजार रुपय प्रतिक्विंटल दराने विकण्यासाठी करारसुद्धा करण्यात आला आहे.
- आरिफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com