Drought Alert : नांदेड नायगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करून दुष्काळी काळातील सर्व सवलती लागू कराव्यात, असे निवेदन नायगाव तहसीलदारांना देण्यात आले..नायगाव तालुक्यात १ जून ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सरासरी ५६१ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ४१४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पर्जन्यमानात २५ टक्के तूट आहे. सप्टेंबर महिन्यातही कमी पर्जन्यमान राहण्याचा अंदाज असल्याने रब्बी हंगाम घेणेही अशक्य होण्याची शक्यता आहे. शेतकरी निराशेच्या गर्तेत जाण्यापूर्वी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली..Rohit Pawar Demands Drought Declaration: शेतीसमोर संकट अधिक गडद? तत्काळ दुष्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, १० मुद्दे केले उपस्थित.नायगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, निविष्ठा मदतीत वाढ करावी, जिरायती पिकांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये आणि बागायती पिकांसाठी हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, पंतप्रधान पीकविमा योजनेत ‘हंगामातील प्रतिकूल परिस्थिती’ या जोखमीअंतर्गत शेतकऱ्यांना तातडीने २५ टक्के अग्रीम पीकविमा नुकसानभरपाई द्यावी, चार्यासाठी पशुपालकांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट आर्थिक मदत जमा करावी, शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, बारूळ कालव्यातून पाणी सोडावे, सरसकट पीक कर्जमाफी करून नव्याने पीक कर्ज द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या..Marathwada Drought: सोयाबीनसह खरीप पिके करपली, नेते शेतीच्या बांधावर, सरकार दुष्काळ कधी जाहीर करणार?.शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन तहसीलदारांनी त्यांच्या भावना जिल्हा प्रशासन व शासनापर्यंत पोहोचवाव्यात. अन्यथा नायगाव तालुक्यातील शेतकरी आगामी काळात तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला..यावेळी गजानन पाटील होटाळकर, रमेश पाटील, शिवा पाटील वडजे, अजिंक्य पाटील कल्याण, संतोष पाटील कदम, बळवंत पाटील मोरे, पंडित पाटील सुगावे, शिवाजी पाटील शहापुरे, सुनील पवार, रामदास उमरेकर, लक्ष्मण जाधव, गणेश ढगे, साहेबराव शिंदे, श्याम शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.