Swabhimani Shetkari Sanghtana  Agrowon
ॲग्रो विशेष

Swabhimani Shetkari Sanghtana Protest : परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

Farmer Demands : अतिवृष्टीमुळे नदी, नाले व ओढ्याकाठच्या जमिनीवरील पिकांचे मोठे नुकसान झाले असून या जमिनीवरील पीक नुकसानीचे सँपल सर्वे रद्द करावेत. तसेच सर्व बाधित शेतकऱ्यांना आठ दिवसांच्या आत पीकविमा भरपाई देण्यात यावी.

Team Agrowon

Parbhani News : अतिवृष्टीमुळे नदी, नाले व ओढ्याकाठच्या जमिनीवरील पिकांचे मोठे नुकसान झाले असून या जमिनीवरील पीक नुकसानीचे सँपल सर्वे रद्द करावेत. तसेच सर्व बाधित शेतकऱ्यांना आठ दिवसांच्या आत पीकविमा भरपाई देण्यात यावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी (ता.१२) जिल्हाधिकारी कार्यालयात चटणी भाकर खाऊन आंदोलन करण्यात आले.

परभणी जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढ्याकाठच्या शेतजमिनी खरवडून गेल्या आहेत. खरीप हंगामातील पिकांपासून शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही.

त्यामुळे सँपल सर्वे न करता विमा कंपनीने विमा संरक्षित रक्कम आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. अतिवृष्टीमुळे पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट येणार आहे.

त्यामुळे मध्यम हंगाम प्रतिकूल स्थिती अंतर्गत उभ्या पिकांचे सर्वे करून शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम आठ दिवसांच्या आत अदा करावा, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात चटणी भाकर खाऊन आंदोलन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Farmer Registration: हरभरा नोंदणीला १५ एप्रिलपर्यंत मुदत

Maharashtra Heatwave Alert: कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता

Ujani Water Tourism: उजनी जलपर्यटनाचे भवितव्य अंधारात

Agriculture Officer Retirement: नाशिक ‘झेडपी’चे कृषी विकास अधिकारी शेवाळे सेवानिवृत्त

Revenue Department: अधिकाऱ्यांनी गावांत जाऊन समस्या सोडवाव्या: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT