Farmers Demands : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक

Kisan Sabha : शेतकरी आत्महत्येचे प्रमाण व शेतीचे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्यावी, अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी.
Farmer Movement
Farmer MovementAgrowon
Published on
Updated on

Beed News : शेतकरी आत्महत्येचे प्रमाण व शेतीचे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्यावी, अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी यांसह इतर मागण्यांसाठी बीड जिल्हा किसान सभा आक्रमक झाली आहे. मागण्या पूर्ण करा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून (ता. ९) किसान सभेने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.

किसान सभेच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यामध्ये सलग दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील ६१ महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती. अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला असून जिल्ह्यातील ६५७ गावांमधील १ लाख ४४ हजार ५६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Farmer Movement
Farmer Demands : नाफेडने सोयाबीन खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करून वाटप करावी यांसह शेतकऱ्यांच्या आत्महत्या व नुकसान पाहता तत्काळ कर्जमाफी करावी या प्रमुख मागण्या प्राधान्याने पुढे करण्यात आल्या आहेत.

Farmer Movement
Soybean Farmer Issue : दराअभावी शेतकरी सोयाबीन पिकापासून दूर जातील

मागण्या पूर्ण न झाल्यास ९ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा किसान सभेच्या वतीने देण्यात आला होता. त्यानुसार धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या वेळी किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली.

बेमुदत धरणे आंदोलनात कॉ. अजय बुरांडे परळी, कॉ. काशिराम सिरसाट धारूर, कॉ. कृष्णा सोळंके माजलगाव, कॉ. गणेश कदम माजलगाव, कॉ. ॲड संजय चोले धारूर, कॉ. रवींद्र देवरवाडे अंबाजोगाई, कॉ. विष्णुपंत देशमुख, कॉ. वैजनाथ पाळवदे परळी, कॉ. अंकुश उबाळे, कॉ. प्रवीण देशमुख, कॉ कमलाकर सोळंके धारूर, कॉ. विशाल देशमुख, कॉ. विनायक राजमाने, कॉ. ज्ञानोबा देशमुख, कॉ. सुहास जायभाय बीड व कॉ. विनायक चव्हाण गेवराई, अशोक नागरगोजे, कॉ. मनोज देशमुख, कॉ. कुमार महाजन व इतर किसान सभेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com