Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest : कांदे, द्राक्षांसह रस्त्यावर फेकल्या बँक नोटिसा

‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी वणी (ता. दिंडोरी) येथे कांदे, द्राक्ष्यांसह बँक नोटिसा रस्त्यावर फेकत आंदोलन केले.

Team Agrowon

Nashik Farmer Protest : संपूर्ण राज्यभर शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्र झाले आहेत. द्राक्ष (Grape), कांदा (onion) , सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton) यांसारख्या पिकांचे बाजारभाव गडगडले आहेत. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत.

वीजदरवाढ सरकारने प्रस्तावित केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे वीजबिल थकले आहे त्यांचे वीजजोड तोडण्यात येत आहेत. एक बाजूला शेतमालाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे.

परिणामी राज्यातला शेतकरी त्रस्त आहे. यासह अनेक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी (ता. २२) राज्यभरात रास्ता रोको आंदोलन पुकारले होते.

नाशिक जिल्ह्यात त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी वणी (ता. दिंडोरी) येथे कांदे, द्राक्ष्यांसह बँक नोटिसा रस्त्यावर फेकत आंदोलन केले.

जिल्ह्यात कांदा दर आणि जिल्हा बँकेचा प्रश्न तीव्र झाला आहे. वणी येथे ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या उपस्थितीत रस्ता रोको करून शेतकऱ्यांनी याविरुद्धचा संताप व्यक्त केला.

जिल्ह्यातील साधारण ६२ हजार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. याविरुद्ध पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बिऱ्हाड आंदोलन झाले.

या आंदोलनात ‘ओटीएस’ देण्याच्या आश्वासन शासनाने दिले होते. परंतु याची आठवण सत्ताधाऱ्यांना राहिली नाही. तसेच द्राक्ष आणि कांदा दर गडगडले आहेत.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहे. या विषयांवर शेतकऱ्यांनी आंदोलनात आक्रोश केला.

आंदोलनात स्वाभिमानी संघटनेसोबत नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समिती अध्यक्ष प्रशांत कड, गंगाधर निखाडे, संतोष रेहरे, विलास भवर, ‘स्वाभिमानी’चे दिंडोरी तालुकाध्यक्ष संदीप उफाडे यांच्यासह नेते व शेतकरी सक्रिय सहभागी झाले होते.

..तर विधानभवनावर कांदे, बँक नोटिसा फेकणार

कांदा चार ते सहा रुपये किलोने विकतो आहे. चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. जगात नव्या बाजारपेठा शोधण्यात हे सरकार अपयशी ठरले. यामुळे कांद्याचे भाव पडलेत.

कांदा प्रश्नावर सरकारने लक्ष दिले नाही व नाशिक जिल्ह्यातील ६२ हजार शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या संदर्भाने बिऱ्हाड आंदोलनात पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही तर अधिवेशन काळामध्ये कांदे व जिल्हा बँकेच्या जप्तीच्या नोटिसा आम्ही विधानभवनावर फेकणार, असा इशारा संदीप जगताप यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT