Onion Crop : खानदेशात कांदा पिकाची वाढ जोमात

खानदेशात धुळ्यात सर्वाधिक कांदा लागवड झाली आहे. यापाठोपाठ जळगावात लागवड आहे.
Onion Crop
Onion CropAgrowon
Published on
Updated on

Jalgaon Onion News : खानदेशात कांदा पिकाची (Onion Crop) वाढ जोमात होत आहे. सध्या प्रतिकूल वातावरण आहे. पिकात तणनियंत्रण, फवारणी, खते देण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे.

अनेकांनी नोव्हेंबरअखेरीस लागवड (onion Cultivation) केली. तर काही शेतकऱ्यांनी जानेवारीच्या मध्यातही कांदा लागवड केली आहे. परंतु कमाल लागवड डिसेंबरच्या अखेरीस झाली आहे.

यंदा लागवड किंचित कमी झाली आहे. कारण खरिपात आणि मागील वर्षी उन्हाळ कांद्यालाही दर नव्हते. उत्पादन खर्च मात्र वाढला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी क्षेत्र कमी केले. तर काहींनी कांदा लागवड टाळली आहे.

प्रतिकूल वातावरणात बुरशीजन्य रोग व इतर समस्या येण्याची भीती असते. खानदेशात सध्या ढगाळ वातावरण आहे. किमान तापमान १५ अंश सेल्सिअस आहे.

Onion Crop
Onion Rate : कांदा बाजाराचे अंदाज का चुकले?

तर दिवसा आठवडाभरापासून ऊन तापत आहे. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. विषम वातावरण असल्याने कांदा पिकावर परिणाम होईल, या भीतीने शेतकरी बुरशीनाशके, संप्रेरके आदींच्या फवारण्या घेत आहेत.

जानेवारीत कोरडे व थंड वातावरण होते. यामुळे पिकाची वाढ बऱ्यापैकी झाली. सध्या पीकस्थिती बरी आहे. परंतु ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस आल्यास आणखी समस्या तयार होतील, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

दोन महिन्यांच्या पिकात अनेकांनी मजुरांकरवी तणनियंत्रण करून घेतले. तर काहींनी तणनाशकांचा उपयोग केला आहे. परंतु तणनाशकांमुळे मोठ्या पानांचे तण नियंत्रित न झाल्याने शेतकऱ्यांना मजुरांकरवी तणनियंत्रण करून घ्यावे लागले. यात खर्च वाढला आहे.

एकदा बेसल डोस पिकास दिला आहे. तसेच दोनदा बुरशीनाशकांची फवारणीदेखील दोन महिन्यांच्या पिकात झाली आहे. पिकाची काढणी मार्चअखेरीस सुरू होईल. मे महिन्याच्या मध्यापर्यंत काढणी सुरू राहील, असे चित्र खानदेशात आहे.

एकूण साडेसहा हजार हेक्टरवर कांदा

खानदेशात धुळ्यात सर्वाधिक कांदा लागवड झाली आहे. यापाठोपाठ जळगावात लागवड आहे. एकूण सुमारे साडेसहा हजार हेक्टरवर कांदा पीक आहे.

धुळ्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर, जळगावात अडीच हजार तर नंदुरबारातही सुमारे ५०० ते ६०० हेक्टरवर कांदा पीक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com