Sugarcane FRP agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : 'साहेब चहा नको दूसरा हफ्ता द्या', शेतकऱ्यांनी साखर सहसंचालकांना धरलं धारेवर

Kolhapur Collector : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Kolhapur : गतवर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग १० तास रोखून धरला होता. यावेळेस कोल्हापूरचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी शासनाबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार ज्या साखर कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा कमी दर दिला आहे त्या कारखान्यांना प्रतिटन १०० रूपये व ज्या कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा जादा दर दिला आहे त्यांना प्रतिटन ५० रूपये प्रतिटन देण्याचा तोडगा मान्य करण्यात आलेला होता.

दरम्यान अद्याप एकाही साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यात अतिरिक्त रक्कम देण्यात आली नाही. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी येत्या आठवड्याभरात तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडके यांचेकडे करण्यात आली.

साखर सहसंचालक कार्यालयात प्रभारी अधिकारी गोपाळ मावळे यांना चांगलेच धारेवर धरले. सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास कोणतीही पुर्वसूचना न देता टाळे टोकणार असल्याचे ठणकावून सांगितले. दरम्यान साखर सहसंचालक कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना सरकारचा चहा देण्यात आला परंतु या शेतकऱ्यांना आम्हाला चहा नको उसाचा दुसरा हप्ता द्या म्हणत शेतकऱ्यांनी चहा परत पाठविला.

'या' कारखान्यांनी थकवली एफआरपी

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये ३१ जानेवारी अखेर चालू गळीत हंगामातील क्रांती साखर कारखान्याची ४० कोटी, वारणा कारखाना २७ कोटी, आजरा १० कोटी, भोगावती ६ कोटी, हुतात्मा १४ कोटी, सदाशिवराव मंडलिक ९ कोटी, कुंभी ५ कोटी रूपयाची एफ. आर. पी थकविण्यात आली आहे.

याबाबत शासनाकडून दोन महिन्याच्या आत परवानगी घेऊन साखर कारखान्यांनी सदरचा दुसरा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांनी लेखी हमी पत्राद्वारे कळविले आहे.

हंगाम सुरू होवून दोन महिने उलटून गेले तरीही याबाबत शासन अथवा कारखानदारांकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. शासनाकडून व कारखानदार यांचेकडून जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला जात असून यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झालेले आहेत.

यामुळे तातडीने वरीलप्रमाणे साखर कारखान्यांना गत हंगामातील दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर एक आठवड्यात वर्ग करण्यात यावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आपल्या साखर सहसंचालक कार्यालयास कोणतीही पुर्वसूचना न देता ठाळे ठोकून व साखर कारखान्यांची साखर अडवून आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी प्रा.डॅा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, सागर शंभुशेटे, राजाराम देसाई, धनाजी पाटील, विठ्ठल मोरे, राम शिंदे, संपत मोरे, अण्णा मगदूम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT