Dudh Sangh Loot : दूध संस्थांमधील इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांवर दुधाचे मोजमाप अचूक व्हावे यासाठी मागच्या काही महिन्यांपासून संभाजी ब्रिगेडकडून आंदोलन सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संस्थांकडून दूध उत्पादकांची लूट अद्यापही सूरू आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडकडून याबाबत दूध संस्थांचे पितळ उघडे पाडले आहे. यामध्ये जवळपास ५०० मिलीपर्यंत दूध उत्पादकांकडून लुटमार होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
संभाजी ब्रिगेड चे राज्य सहसंघटक रुपेश पाटील यांनी दूध उत्पादकांसाठी आंदोलन सुरू केल आहे. कोल्हापूर सह राज्यभरातील दुधाचे मोजमाप करणारे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे तपासणी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचे सदस्य रुपेश पाटील आहेत. करवीर व पन्हाळा तालुक्यातील दुध संस्थांमधील तपासणी दरम्यान भामटे, मरळी , सुळे व मल्हारपेठ या गावातील १४ दूध संस्थांमधील इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची तपासणी केली.
यापैकी १२ दूध संस्थांमधील काट्यांमधे अचूकता १०० मिली प्रमाणात ठेवणे, कन्वर्जन फॅक्टर बदलून फसवणूक करणे, वजनकाट्यांची सिल तोडून त्यात अनधिकृत बदल करणे यासह काटा १० मिली अचूकतेचा वापरणे पण १० ते ९० मिली दुधाचा मोबदला उत्पादकांना न देणे अशा गंभीर चुका आढळून आल्या आहेत. १० लीटरला ७०० मिली ते एक लिटर जादा दूध उत्पादकांचे बिनमापी जात असल्याची माहिती रुपेश पाटील यांनी दिली.
तसेच वरील सर्व संस्थांमधे दुधाचे फॅट सॅम्पल तपासणीत ५० मिली इतके दूध घेत असून काही संस्था एसएनएफ तपासत नसल्याचे आढळून आले. दुग्ध विकास विभागाच्या तपासणी अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली असून कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहेत.
या तपासणी मोहिमेत वैधमापनशास्त्रचे उपनियंत्रक दत्तात्रय पवार, निरिक्षक ए.टी.पाटील यांच्यासह दुग्ध विकास विभागाचे अधिकारी सहभागी झाले.
संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य सहसंघटक रुपेश पाटील, अभिजीत कांजर, शिवाजी गुरव ,राहूल पाटील ,सरदार पाटील, कार्तिक पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान समजून घ्यावे. निदान शेतकरी कुटुंबातील शिकलेल्या तरुण, तरुणींनी याची माहिती घेऊन गावातील दूध उत्पादकांना वजनकाटे, फॅट मशीन व एसएनएफ मशीन यांची उलटतपासणी शिकवावी. दूध उत्पादकांना व्यवहारास तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत होण्यासाठी पुढील काळात ग्राम साक्षर अभियान राबविण्यात येणार असून तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन रुपेश पाटील यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.