Educational Abhiyan Agrowon
ॲग्रो विशेष

Aadarsh Shala Yojana : ‘मुख्यमंत्री सुंदर शाळा’ अभियानाला ग्रहण

Educational Abhiyan : शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान हाती घेतले आहे. मात्र, जिल्ह्यात रिक्त असलेल्या तब्बल १८०० शिक्षकांच्या रिक्त पदामुळे या अभियानाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Satara News : शासनाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांत शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण निर्माण व्हावे, दर्जेदार व कौशल्यपूर्ण शिक्षणाबरोबरच गुणवत्ता सुधारावी,

यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान हाती घेतले आहे. मात्र, जिल्ह्यात रिक्त असलेल्या तब्बल १८०० शिक्षकांच्या रिक्त पदामुळे या अभियानाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अभियान राबविण्याचा हेतू शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणे, व्यवसाय शिक्षणाची ओळख आदी घटकांची अंमलबजावणी व्हावी आणि शाळांनी आपापसांत स्पर्धा करून शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, हा या अभियानाचा उद्देश आहे.

असे केले जाईल स्पर्धेचे गुणांकन

अभियानात शाळांचे विविध घटकावर १०० गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. यामध्ये शाळा परिसराचे सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व वैयक्तिक विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन तसेच अधिकाधिक देशी खेळांना प्राधान्य, या घटकांवर ६० गुणांचे मूल्यांकन होणार आहे.

शिक्षकांपुढे आव्हानच

शासनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याच्या उद्देशाने हे अभियान १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू केले आहे. जिल्ह्यात सुमारे दहा ते बारा वर्षे शिक्षक पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया झालेली नाही.

त्यामुळे जिल्ह्यात सुमारे १८०० हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अशा रिक्त पदांमुळे शिक्षण विभागापुढे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानातील स्पर्धा करण्याचे आव्हान आहे.

मिळणारी बक्षिसे...

तालुकास्तर - प्रथम तीन : तीन लाख, दोन लाख, एक लाख

जिल्हास्तर - प्रथम तीन : ११ लाख, पाच लाख, तीन लाख

विभागीयस्तर - प्रथम तीन : २१ लाख, ११ लाख, सात लाख

राज्यस्तर - प्रथम तीन : ५१ लाख, २१ लाख, ११ लाख

योजनेचा एकूण अपेक्षित खर्च : ८६७३ लाख

जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेचे वास्तव

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची संख्या - २६८९

जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या - ७२३७

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या -१२२६५४

शिक्षकांची रिक्त पदे - सुमारे १८००

२० पटसंख्येच्या आतील शाळा - सुमारे ४० टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT