Educational Abhiyan : ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान यशस्वी करा : पाटील

Administrator Santosh Patil : ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाअंतर्गत शाळांना लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक संतोष पाटील यांनी दिली.
Administrator Santosh Patil
Administrator Santosh Patil Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाअंतर्गत सर्व माध्यमांमधील शाळांची गुणवत्ता, पटसंख्या, चांगल्या सुविधांचे मूल्यांकन केले जाणार आहे. ज्या शाळेची गुणवत्ता वाढेल, त्या शाळांना लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक संतोष पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा योजनेअंतर्गत जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान राबविले जाणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील २ हजार ९३ शासकीय शाळा, १ हजार ५८५ खासगी अशा एकूण ३ हजार ६७८ शाळा सहभागी झाल्या असून शाळांनी अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Administrator Santosh Patil
EU Farmer Protest : युरोपियन महासंघातील शेतकरी आंदोलनाच्या 'व्हायरल व्हिडिओ' मागील सत्य काय ?

ते म्हणाले, की माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत तालुका, जिल्हा, विभागस्तर आणि राज्यस्तरावर यश मिळवणाऱ्या शाळांना प्रत्येक स्तरावर लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन दिले पाहिजे.

Administrator Santosh Patil
Agricultural Commodity Market : कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी

शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंददायी वातावरण निर्माण केले पाहिजे. क्रीडा स्पर्धा, आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले पाहिजे. शिक्षणाधिकारी मीना शेंडकर म्हणाल्या, की या अभियानात विद्यार्थी केंद्रित उपक्रमाला ६० गुण आणि शाळा व्यवस्थापनासाठी ४० गुण, असे एकूण १०० गुण दिले जातील. अभियानात विद्यार्थी, पालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

...अशी असतील बक्षिसे

तालुका पातळीवर : प्रथम ३ लाख, द्वितीय २ लाख व तृतीय १ लाख रुपये.

जिल्हा पातळीवर : प्रथम ११ लाख, द्वितीय ५ लाख व तृतीय ३ लाख रुपये

विभाग पातळीवर : प्रथम २१ लाख, द्वितीय ११ लाख व तृतीय ७ लाख रुपये

राज्य पातळीवर : प्रथम ५१ लाख रुपये, द्वितीय २१ लाख व तृतीय ११ लाख रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com