Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : पीक नुकसानीचे पंचनामे अपूर्णच

Crop Insurance : खानदेशात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी झाली आहे. शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी झाली आहे. शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या. अधिकारी, लोकप्रतिनिधींचे पाहणी दौरे पूर्ण झाले. परंतु पंचनामे अपूर्णच आहेत. अनेक भागांत महसुली कर्मचारी व विमा कंपनीचे प्रतिनिधी पोचलेच नाहीत. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे.

विमा कंपनीकडे नुकसान झाल्यानंतर ७२ तासांत ऑनलाइन तक्रार अनेक शेतकऱ्यांनी नोंदविली आहे. सुमारे पाच हजार ऑनलाइन तक्रारी जळगाव, धुळे जिल्ह्यांतून दाखल झाल्या आहेत. परंतु या तक्रारींची अंतिम कार्यवाही पाहणी, पंचनामे केल्यानंतर होते. ती पूर्ण झालेली नाही. काही भागात विमा कंपनी प्रतिनिधींसोबत महसुली व कृषी विभागाचे कर्मचारी येत नाहीत.

तर काही भागात महसुली कर्मचारी येतात, पण विमा कंपनीचे कर्मचारी येत नाहीत. फळ पीकविमा योजनेतून केळी विमाधारकांना वादळ, गारपीट किंवा वेगाच्या वाऱ्याने झालेल्या नुकसानीसंबंधी परतावे दिले जातात.

त्यासाठी वादळ, वेगाचा वारा आल्यानंतर ७२ तासांत तक्रार विमा कंपनीकडे नोंदवायची असते. अनेक शेतकऱ्यांना ही तक्रार नोंदविताना तांत्रिक किंवा नेटवर्क व अन्य अडचणी आल्या. काही शेतकऱ्यांना मोबाइल हाताळता येत नसल्याने तक्रार नोंदविता आलेली नसल्याची देखील माहिती आहे.

केळीच्या नुकसानीसंबंधी यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर भागातून विमा कंपनीकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. सुमारे साडेचार हजारांवर तक्रारी दाखल आहेत. परंतु त्यावर तत्काळ कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिला दिला जावा, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

महसूल प्रशासनाने अनेक गावांत नुकसानच नाही. वादळच नव्हते, अशी भूमिका घेऊन संबंधित गावात पाहणीच केलेली नाही. यामुळे देखील अडचण येत आहे. खानदेशात वादळात केळीचे सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. यामुळे मोठा वित्तीय फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT