Crop Damage : खानदेशात वादळात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी

Banana Crop Damage : नुकसान पातळी वाढतीच; सुमारे २१०० हेक्टर केळीला फटका
Crop Damage
Crop DamageAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon News : जळगाव ः खानदेशात मागील तीन दिवस विविध भागात वादळी पाऊस झाला असून, यात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी झाली आहे. महसूल प्रशासन पंचनामे करीत असून, जळगाव जिल्ह्यात सुमारे २१०० हेक्टरवरील केळी बागांची हानी झाल्याचा अंदाज आहे.
शुक्रवार (ता.२४), शनिवार (ता.२५) व रविवारीदेखील (ता.२६) खानदेशात वादळी पाऊस झाला आहे. यात केळीची मोठी हानी मुक्ताईनगर तालुक्यात झाली असून, सुमारे १२०० हेक्टरला मोठा फटका बसला आहे. तसेच जामनेरात १००, रावेरात ६००, यावलमध्ये २०० आणि जळगाव तालुक्यातही सुमारे १०० हेक्टरवरील केळी भुईसपाट झाली आहे. सुमारे दोन हजारपेक्षा अधिक केळी उत्पादांचे यात नुकसान झाले आहे.

रावेरातील खिरोदा, चिनावल, निरूळ,अटवाडे, नेहेते, कोचूर, रोझोदा, यावलमधील न्हावी, भालोद, किनगाव, डांभुर्णी, मुक्ताईनगरातील अंतुर्ली, नायगाव, धाबे, पिंप्रीनांदू, मानेगाव, जळगावातील खेडी खुर्द, पिलखेडा, गाढोदे, फुपनगरी, फुपणी, जामनेरातील गोरनाळे, देऊळगाव, तोरनाळा, पळासखेडा आदी भागात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी झाली आहे. यात केळीला वादळाचा अधिकचा फटका बसला आहे. सलग तीन दिवस वादळी पाऊस आल्याने लहान केळीबागांची पाने फाटून नुकसान पातळी ५० टक्क्यांपर्यंत पोचली आहे. मोठ्या बागा किंवा काढणीवरील बागा भुईसपाट झाल्या आहेत.

Crop Damage
Crop Damage : खानदेशात साडेचार हजार हेक्टरवरील पिकांची हानी

दुसरीकडे उष्णताही अधिक आहे. रोज ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान आहे. या स्थितीत महसूल प्रशासन पंचनामे करीत आहे. विमा कंपनीनेदेखील संबंधित भागात पंचनामे तत्काळ उरकून भरपाईसंबंधी पुढील कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.
वादळी पाऊस झाला पण महसूल प्रशासन, कृषी सहायक अनेक भागात पोचलेलेच नसल्याच्या तक्रारीदेखील आहे. महसूल प्रशासन नुकसानीची टक्केवारी कमी आहे, आम्हाला आदेश नाहीत, असे सांगून ढकलाढकली करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, प्रशासनातील वरिष्ठांनी दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. धुळे व नंदुरबारातही सुमारे ३०० हेक्टरवरील केळीबागांसह अन्य पिकांना फटका बसला आहे. काही भागात अंशतः हानी झाली आहे.


मंत्र्यांची पाहणी...
मंत्री गिरीश महाजन यांनी या नुकसानीबाबत जामनेराती गोरनाळे, देऊळगाव, तोरनाळे, मुक्ताईनगरातील पातोंडी, रावेरातील तांदलवाडी व अन्य भागात केळी पिकहानीची पाहणी केली. यात अनेक भागात गोठे, घरांची पत्रे उडून गेल्याचे दिसून आले. तसेच केळीची हानी अधिक झाली आहे. याबाबत प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून पुढील कार्यवाही करावी, असे आदेश मंत्री महाजन यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com