Kharif Season 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season 2024 : शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा करा ः कदम

Agricultural inputs : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, आवश्यक त्या प्रमाणात, एमआरपी दराने व वेळीच कृषी निविष्ठांचा पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिले.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Hingoli News : हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, आवश्यक त्या प्रमाणात, एमआरपी दराने व वेळीच कृषी निविष्ठांचा पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, घाऊक विक्रेते, वितरकांचा समन्वय साधण्यासाठी कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत कदम बोलत होते. उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, मोहीम अधिकारी आणि सर्व पंचायत समितीचे गुण नियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी उपस्थित होते.

कृषी निविष्ठेचा व्यवसाय हा कायद्याने निश्चित करून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करावा. कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांचे कृषी निविष्ठा घाऊक विक्रेते, वितरक यांच्याकडे ते व्यवसाय करीत असलेल्या उत्पादक कंपनीचे बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी कृषी निविष्ठांच्या उत्पादनांच्या उगम प्रमाणपत्रांचा त्यांच्या परवान्यामध्ये कायद्याने समावेश आवश्यक आहे. शेतकऱ्यांची विशिष्ट वाणाची मागणी असलेल्या कापूस बियाण्यांची विक्री कृषी विभागाच्या निगराणीखाली करण्यात येणार असून शेतकऱ्यांना जादा दराने कापूस बियाण्यांची विक्री केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना कदम यांनी दिल्या.

या व्यतिरिक्त रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी हिंगोली जिल्ह्यास मंजूर आराखड्याप्रमाणे रासायनिक खतांचा पुरवठा करावा. खतांचा पुरवठा करताना जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये आवश्यकतेनुसार समतोल राखावा. रासायनिक खतांसोबत इतर अनावश्यक उत्पादनांची रासायनिक खते कंपन्यांनी घाऊक विक्रेत्यांना, त्यांनी किरकोळ विक्रेत्यांना आणि किरकोळ विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना खरेदीसाठी सक्ती करू नये, ‌अशा सूचना दिल्या. कीटकनाशके हाताळणी करताना विषबाधा टाळण्याबाबत मेळावे आयोजित करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

तालुकानिहाय विक्रेता प्रशिक्षण

किरकोळ विक्रेत्यांनादेखील याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी सोमवारी (ता. १३) सकाळी ११ वाजता औंढा नागनाथ येथे, दुपारी ३ वाजता वसमतला, गुरुवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता कळमनुरी येथे व शुक्रवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता सेनगाव येथे, दुपारी ३ वाजता हिंगोली येथे तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्याच्या सूचनाही कदम यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune APMC: पुणे बाजार समितीच्या नवीन फुलबाजाराचे काम संथ गतीने

IAS Varsha Ladda: कृषी शिक्षण परिषदेच्या महासंचालकपदी वर्षा लड्डा

Sharad Pawar: आणीबाणीवर सत्ताधाऱ्यांनी टीका करू नये: शरद पवार

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीवर प्रशासक की राष्‍ट्रीय बाजार?

Pandharpur Darshan: ‘व्हीआयपी’ दर्शन बंद केल्याने, १५ तासांचे दर्शन ५ तासांवर

SCROLL FOR NEXT