Hingoli News : यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रांवरून बियाणे (Seed), खते (Fertilizer), कीटकनाशके (Pesticide) आदी कृषी निविष्ठा खरेदी करतांना गुणवत्ता व दर्जा बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर १ आणि तालुका स्तरावर ५ असे एकूण ६ तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषेदेचे कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे यांनी दिली.
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आणि वेळेत गुणात्मक दर्जाच्या कृषी निविष्ठा एमआरपी दराने उपलब्ध होण्यासाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागातील गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत नियमित कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची आणि कृषी निविष्ठांची तपासणी करण्यात येत असते.
यानंतरही शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा विक्री केंद्रावरून कृषी निविष्ठांची खरेदी करताना काही अडचण अथवा खरेदी पश्चात खरीप हंगाम संपेपर्यंत कृषी निविष्ठांचा दर्जा व गुणवत्ता आदीबाबतीत काही संशय आल्यास अथवा त्यामध्ये आपली फसवणूक झाली असे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांच्या तक्रारीचे वेळीच निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर एक व पाचही तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ६ तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
संबंधित तालुक्यातील शेतकरी कृषी निविष्ठाबाबतची तक्रार तत्काळ दूरध्वनीवरुन संपर्क क्रमांकावर नोंदवू शकतात.
तक्रारीच्या स्वरूपानुसार शेतकऱ्यांनी संबंधित गुण नियंत्रण निरीक्षकांकडे, तक्रार निवारण कक्ष प्रमुखाकडे लेखी तक्रार अर्जासोबत कृषी निविष्ठांच्या खरेदीची पावती, सातबारा, होल्डींग आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक असल्यास लगेच कळविण्यात येईल.
शेतकऱ्यांनी तक्रार अर्जावर आपला संपूर्ण पत्ता, गांव, तालुका व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा. या व्यतिरिक्त शेतकरी आपली तक्रार संबंधित तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात नोंदवावी आवाहन असे कानवडे यांनी केले आहे.
तक्रार निवारण कक्ष...
जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्ष जिल्हा परिषद कार्यालयातील कृषी विभागामध्ये स्थापन करण्यात आला आहे. त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक ९४२१४९०२२२ आहे. तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्ष संबंधित पंचायत समिती कार्यालयातील कृषी विभागामध्ये स्थापन करण्यात आले आहेत.
तालुका ठिकाण भ्रमणध्वनी क्रमांक
हिंगोली पं.स.कृषी विभाग - ९४०५३२३०५८
कळमनुरी पं.स.कृषी विभाग - ७०३८४७३९०
वसमत पं.स.कृषी विभाग - ९०२८९०५३५७
औंढा नागनाथ पं.स.कृषी विभाग - ८०८७८८९२९९
सेनगाव पं.स.कृषी विभाग - ९१५८१२१७१८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.