Sunflower Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Sunflower Farming : घाटनांद्रा-धारला शेतशिवारामध्ये बहरले सूर्यफुलाचे पीक

Sunflower Cultivation : घाटनांद्रासह परिसरातील धारला, चारणेर, वाडी, पेंडगाव आदी शेतशिवारांमध्ये शेतकऱ्यांनी यावर्षी सुर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : घाटनांद्रासह परिसरातील धारला, चारणेर, वाडी, पेंडगाव आदी शेतशिवारांमध्ये शेतकऱ्यांनी यावर्षी सुर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. सध्या हे पीक चांगलेच बहरात आले आहे.

सोयाबीन, भुईमूग या खाद्य तेल पिकांपाठोपाठ आता घाटनांद्रा शिवारातील शेतकरी सूर्यफुलाचे उत्पन्न घेण्याकडे वळले आहेत. बाजारात सूर्यफुलाच्या खाद्यतेलास मोठी मागणी असल्याने व शेती व्यवस्थापन आणि उत्पादन खर्च कमी, पाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने घाटनांद्रा धारलासह परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा सूर्यफूल लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

लागवडीनंतर सूर्यफुलाचे पीक अवघ्या तीन ते साडेतीन महिन्यांत तयार होते. सुधारित व संकरित जातीचे बियाणे निर्माण झाल्याने कमी वेळात व कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळविता येते. त्यामुळे याकडे नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी याकडे पाहत आहेत. कपाशीचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठीही एक पर्याय म्हणूनही काही शेतकरी या पिकाकडे पहात आहेत.

पिकाची लागवड व व्यवस्थापन तसेच मजुरांची गरज सुद्धा कमी भासते. पीक काढणीला सोपे असल्याने व भाव बऱ्यापैकी मिळत असल्याचे घाटनांद्रासह, धारला येथील शेतकरी सांगतात. धारला येथील तुकाराम ढोके, बालाजी मुंढे, रफिकमिया देशमुख, रखमाजी मोरे, दत्तु मोरे, प्रदिप बोरसे इतर अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी सूर्यफुलाची लागवडीला पसंती दिली आहे. सध्या हे पीक चांगलेच बहरात आले असून संपूर्ण शिवार पिवळे धमक दिसू लागले आहे.

कपाशी काढणीनंतर जोड पीक म्हणून यावर्षी आम्ही सूर्यफुलाचे पीक घेतले आहे. इतर पिकांपेक्षा या पिकाची मशागत कमी व उत्पादन जास्त मिळते, मजुरांचीही कमी प्रमाणात गरज भासते. पिकास प्रतिक्विंटल योग्य भाव मिळाल्यास शेतकऱ्यास बऱ्यापैकी फायदा होतो. तीन एकर क्षेत्रात या पिकाची लागवड केली आहे.
- तुकाराम ढोके, शेतकरी, धारला.
मी यावर्षी गहु हरभरा या पिकांसोबतच कमी खर्चात येणाऱ्या सुर्यफुलाची देखील लागवड केली. सध्या हे पीक चांगले बहरले आहे. बाजारपेठेत यावर्षी या पिकाला चांगला भाव मिळावा एवढीच अपेक्षा आहे.
- मुष्ताक देशमुख, शेतकरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026: माॅन्सूनची आगेकूच सुरुच; माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबर बेटे व्यापून वाटचाली कायम ठेवली

Farm Loan Repayment: यंदाच्या वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा : मंत्री हसन मुश्रीफ

Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव

Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्‍नांचं गांभीर्य समजून घ्यावं’

Khandesh Irrigation Projects: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण

SCROLL FOR NEXT