Rainfall Forecast: माॅन्सून आज काही भागात पुढे सरकला आहे. माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे व्यापली आहेत. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण कायम आहे. तर राज्याच्या भागात उष्णतेची लाट तर काही भागात पावसासाठी पोषक वातावरण आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. .माॅन्सूनने आज अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र तसेच अंदमान आणि निकोबार बेटे या भागात प्रगती केली. माॅन्सूनने आज प्रगतील करत संपूर्ण अंदामान आणि निकोबार बेटे व्यापाली आहेत. तर अंदमान समुद्राचा बहुतांशी भागात प्रगती केली आहे. तर नैऋत्य अरबी समुद्र, कोमोरिन भाग, नैऋत्य आणि आग्नेय बंगालचा उपसागर तसेच पूर्व मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. .Maharashtra Summer Heat: उन्हाच्या चटक्यात वाढ.माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये माॅन्सून नैऋत्य अरबी समुद्राचा काही भागत, कोमोरिन भाग, आग्नेय आणि नेऋत्य बंगालचा उपसागराचा काही भाग तसेच संपूर्ण अंदमान समुद्र व्यापाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. केरळमध्ये माॅन्सून २६ मेच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे. .राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसासाठी पोषक हवामान आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने आज ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यात ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर गोंदीया, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. .Monsoon 2026: मॉन्सून अंदमानात दाखल.पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पुढील ३ दिवस पावसासाठी पोषक हवामान राहील, तर अहिल्यानगर, नांदेड आणि बीड जिल्ह्यात उद्या आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढील ५ दिवस पावसासाठी पोषक हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. .सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला. तर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही भागात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे तर पुढील ३ दिवस उष्णतच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात पुढील ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. .नागपूर जिल्ह्यात उद्यापासून ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्यात आजपासून ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात उद्या उष्णतेची लाट राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.