Moong Agrowon
ॲग्रो विशेष

Moong Cultivation : उन्हाळ मूग पेरणीस पसंती

Summer Moong Sowing : अनेक भागांत मूग काढणी सुरू आहे. उन्हाळ मुगाचे उत्पादन कमी येते, त्यासाठी चांगले वाण नाहीत, अशी ओरड शेतकऱ्यांमध्ये होती.

Team Agrowon

Jalgaon News : खरिपात मुगाचे अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. यामुळे यंदा मुगाचे दर स्थिर होते. त्यात यंदा विविध यंत्रणा, संस्थांनी उन्हाळ मूग पेरणीसंबंधी अभियान सुरू केले. त्यास प्रतिसाद मिळत असून, मूग पेरणी ५०० हेक्टरवर झाल्याची माहिती आहे.

अनेक भागांत मूग काढणी सुरू आहे. उन्हाळ मुगाचे उत्पादन कमी येते, त्यासाठी चांगले वाण नाहीत, अशी ओरड शेतकऱ्यांमध्ये होती. ही बाब लक्षात घेता मुगाचे दर्जेदार वाण, चांगले उत्पादन उन्हाळ हंगामात देणारे वाणही बाजारात आले असून, त्यांची मागणी होती.

मुगाचे उत्पादन खरिपात अतिपाऊस व इतर समस्यांमुळे आलेच नाही. मुगाचा तुटवडा बाजारात अद्याप आहे. त्याचे दर चार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल असे होते. काही शेतकऱ्यांनी कृत्रिम जलसाठ्यांच्या मदतीने खरिपात मुगाचे उत्पादन घेतले होते.

त्याचे उत्पादन एकरी एक ते सव्वा क्विंटल आले, परंतु त्यास दरही कमी मिळाले. उन्हाळ सोयाबीनप्रमाणे उन्हाळ मूग पेरणीसंबंधी काही संस्थांनी आवाहन केले. त्यासंबंधी जनजागृती केली. उन्हाळ मुगाची पेरणी काळ्या कसदार जमिनीत अधिक झाली. काही भागांत अलीकडेच मळणी किंवा काढणी सुरू आहे.

जळगावात अधिक पेरणी शक्य

खानदेशात जळगाव जिल्ह्यात उन्हाळ मुगाची पेरणी अधिक झाली होती. फेब्रुवारीत सुरू झाली. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागांत उन्हाळ मूग पेरणी अधिक होती. या भागात पेरणी झाल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flood Crisis: पाण्याला सीमा नाही

White Grub Attack: हुमणीने पोखरले उसाचे उभे पीक

Farmer Aid: ‘पीएम केअर’मधून शेतकऱ्यांना ५० हजार कोटी द्या : ठाकरे

Nanded Heavy Rainfall: नांदेडला पुन्हा जोरदार पावसाचा तडाखा

National Coconut Conference: गोव्यात १० ऑक्टोबरला राष्ट्रीय नारळ परिषद

SCROLL FOR NEXT