Summer Moong Cultivation: उन्हाळी मुगाची योग्य काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या तज्ज्ञांचे उपाय!

Moong Farming Techniques: उन्हाळी हंगामात मूग लागवड फायदेशीर ठरते कारण या काळात रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी असतो आणि योग्य नियोजन केल्यास भरघोस उत्पादन मिळू शकते. योग्य जमिनीची निवड, बियाणे प्रक्रिया, खत व्यवस्थापन आणि पाणी नियोजन यावर भर दिल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.
Moong Farming
Moong FarmingAgrowon
Published on
Updated on

Moong Crop Management: उन्हाळ्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश व हवामान उष्ण असल्यामुळे मूग पीक चांगले प्रकारे येऊ शकते. उन्हाळी हंगामात मूग लागवड केल्यास रोग-किडींचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात होतो. जर सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल तर मुगाचे चांगले उत्पादन उन्हाळ्यात मिळू शकते.

उन्हाळी मूग लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन निवडावी. पाणथळ, क्षारपड, चोपण तसेच उताऱ्यावरील हलक्या जमिनीवर मुगाची लागवड करू नये. रब्बी पिकाची काढणी केल्यानंतर शेतात पीक अवशेष, पालापाचोळा वेचून शेत स्वच्छ करावे.

पूर्वमशागत

जमिनीची खोल नांगरटीनंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळ्या देताना ५ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत द्यावे.

Moong Farming
Soybean Moong Urad Registration : सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदी ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ; शेतकऱ्यांच्या मागणीला यश

पेरणी

उन्हाळी मुगाची पेरणी २० फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान करावी. उशिरा पेरणी केल्यास हे पीक पावसात सापडण्याची शक्यता असते.

पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी.

पेरणी करताना दोन ओळींत ३० सेंमी आणि दोन रोपांत १० सेंमी अंतर ठेवावे.

पेरणीसाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे. घरचे बियाणे असल्यास दर ३ वर्षांनी बियाणे बदलावे.

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास, थायरम २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच उगवण चांगली होण्यासाठी आणि रोप अवस्थेतील बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबियम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक पीएसबी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणास वापरावे. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते. रायझोबियममुळे पिकाच्या मुळांवरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते.

Chart
ChartAgrowon

खत व्यवस्थापन

पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ५ टन प्रमाणे द्यावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद (४४ किलो युरिया (१ गोणी) व २५० किलो एसएसपी (५ गोणी) किंवा १०० किलो डीएपी) द्यावे. हेक्टरी १५ ते २० किलो एमओपी खताची मात्रा दिल्यास उत्पादनात वाढ मिळण्यास मदत होते.

विद्राव्य खतांची फवारणी (फवारणी : प्रतिलिटर पाणी)

पीक फुलोऱ्यात असताना : युरिया (२ टक्के) २० ग्रॅम

शेंगा भरत असताना : डीएपी (२ टक्क) २० ग्रॅम

Moong Farming
Moong Rate : हिंगोली बाजार समितीत मूग १०,००० ते १३,०५० रुपये दर

आंतरमशागत

पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी हलकी डवरणी करावी. त्यानंतर गरज भासल्यास १० ते १२ दिवसांनी पुन्हा एखादी खुरपणी करावे. शक्यतो पेरणीपासून ३० ते ३५ दिवसांपर्यंत शेत तणविरहित ठेवावे.

पाणी व्यवस्थापन

पेरणीपूर्वी एक पाणी द्यावे. जमीन वाफसा स्थितीत आल्यानंतर पेरणी करावी. पेरणीनंतर पहिल्यांदा ३ ते ४ दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे. पहिल्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. पिकास साधारणपणे पाण्याच्या ५ ते ६ पाळ्या संपूर्ण कालावधीत द्याव्यात. विशेषतः पीक फुलोऱ्यात असताना व शेंगा भरताना पाण्याच्या ताण पडू देऊ नये.

- डॉ. आदिनाथ ताकटे  ९४०४०३२३८९

(कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com