Bajara Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Bajara Cultivation : उन्हाळी बाजरीला बळीराजाची पसंती

Team Agrowon

Bajara Yesgaon News : गाव व परिसरात खरीप व रब्बी पिकाला अवकाळी पाऊस व गारांचा फटका बसला आहे. यामुळे ऐन खरिपात शेतकऱ्यांचा तोंडाचा घास हिरावला गेला. त्यामुळे रब्बीची अवस्था पाहून आणि गहू, कांद्यापेक्षा बाजरीला कमी पाणी लागत असल्याने कसमादे भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीची लागवड केली.

बाजरी पिकाला इतर पिकांपेक्षा कमी खर्च येतो. उन्हाळ्यात रोग किडींचा प्रादुर्भाव प्रमाण कमी असतो. त्यामुळे कसमादे पट्ट्यात अनेक भागात बाजरीचे पीक दिसते. सध्या बाजरी पक्व होण्याच्या मार्गावर आहे. बाजरीही बेमोसमी पावसात सापडली मात्र दाणे भरण्यासाठी पावसाचा लाभच झाल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

खरिपात बाजरीचे हे पीक परवडत नाही. बाजरीचे बाजारभाव दरही कमी असतात. त्यामुळे आर्थिक नियोजन कमी होते. तेवढाच क्षेत्रात कांदा, भाजीपाला, कापूस, मका जास्त पैसे देऊन जातात.

कसमादे पट्ट्यात बाजरीच्या भाकरीला अधिक प्राधान्य आहे. हंगामात इतर राज्यातून आलेली बाजरीची खरेदी करतात मात्र बाजरीचा रंग हिरवा असला तरी ती खाण्यास बेचव लागते. त्यामुळे शेतकरी घरगुती बाजरी शोधतो.

घरगुती बाजरीला सध्या पायलीला दोनशे रुपये ते दोनशे वीस रुपये भाव आहे. दोन्ही हंगामात गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त झाला म्हणून तो उन्हाळी बाजरी पिकाकडे वळला आहे.

अनेक भागात बाजरीचे चांगले पीक दिसून येत आहे. शेतकरी बाजरीचे पीक घरात येण्याची वाट पाहत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT