मनोज कापडे
स्वराज्यात कधी काळी राजाधिराजांनी प्रत्येक गिरीदुर्गाभोवती शेतकऱ्यांना संघटित करीत कणसाऐवजी तलवारी,भाले उभे केले होते.
आज त्याच स्वराज्याच्या केंद्रस्थानात कष्टकरी बळीराजा भरघोस पिके घेतो आहे. शिवनेरी किल्ल्याच्या अगदी समोर असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात उभा आहे.
हा चार फाळी आधुनिक नांगर आणि दुसऱ्यात छायाचित्रात शिवनेरीच्या समोर तरारून आलेले उन्हाळी बाजरीचे हे समृध्द रान..!
खिंडीतून धाडधाड आवाज येत होते. कुणाचा तरी पाठलाग होत होता. मी चरकलो. एक हुप्या वेगाने माझ्याकडे आला. त्याच्या मागे त्याचेच तीन आडदांड भाऊबंद पाठलाग करीत होते.
त्याला धाकदपटशा दाखवत होते. सारी माकडे म्हणजे काळ्या तोंडाची मोठी वानरं होती. साऱ्यांनी माझ्यावरच राग काढला तर काय, असा प्रश्न मला सतावू लागला. पण, पुढे काही झाले नाही.
तिघे जेते आरोळ्या ठोकत निघून गेले. नंतर चौथादेखील हळुच जंगलात नाहीसा झाला. मी पायवाटेसंगे चालू लागलो.