Sangali News: सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले. महिनाभर झालेल्या संततधार पावसाने खरिपातील पिके डोळ्यादेखत मातीमोल झाली. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी खचला, पण हार मानली नाही. .शेतकरी पुन्हा उभा राहिला आहे. रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी करू लागला आहे. जिल्ह्यात रब्बीची पेरणी सुरु झाली असून ३४८० हेक्टरवर पेरा झाला आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. शेतात पाणी साचले. काढणीला आलेले सोयाबीन, भुईमूग यासह अन्य पिकांचे नुकसान झाले..Rabi Sowing : रब्बी पेरणी रखडत दीपोत्सवानंतर वेग शक्य .खरिपाचा हंगाम हातचा गेल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष पूर्णपणे रब्बी हंगामाकडे वळले आहे. जमिनीतील ओलावा टिकून आहे. याच ओलाव्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी मिळेल त्या परिस्थितीत शेताची मशागत करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः जत, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि खानापूर या दुष्काळी तालुक्यांमध्ये रब्बी ज्वारीचे क्षेत्र मोठे आहे..Rabi Sowing: रब्बी पेरा ६५ लाख हेक्टरपर्यंत राहणार.जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ज्वारीचे ३३४८, गहू, ७७७०, मका ४५७५ आणि हरभरा ४३२३ क्विंटल असे एकूण १९ हजार ९१६ क्विंटल बियाणे मागणी केली आहे. तर युरिया ५६७८९, डीएपी २१८४०, एमओपी २२१३४, यासह अन्य खते ८१६५८ टन असे एकूण १ लाख ८२ हजार ४३० टन खतांची मागणी केली आहे. कृषी विभागाने मागणी केलेल्याप्रमाणे बियाणे, खतांची उपलब्धता झाली आहे..जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९४ हजार ३९३ हेक्टर आहे. जिल्ह्यात ३४८० हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापैकी २५६० हेक्टरवर रब्बी ज्वारीचा पेरा तर मक्याचा ८२२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पिकांच्या पेरणीसाठी पूर्व मशागती सुरू केल्या आहेत. अनेक ठिकाणी पेरणीची कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहेत. येत्या पंधरा ते वीस दिवसानंतर पेरणीची गती वाढले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.