Crop Insurance: पीकविमा परतावा खात्यात जमा होण्यास सुरुवात
Sindhudurg Farmers: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या खात्यात अखेर शनिवारी (ता. १८)पासून पीक विमा परताव्याची रक्कम जमा होऊ लागली आहे. ९० कोटींपैकी ५४ कोटींचा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून उर्वरित रक्कम पुढील काही दिवसांत मिळणार आहे.