Sugarcane Loan Rates 
ॲग्रो विशेष

Sugarcane Loan Rates : पुढील हंगामात ऊसपीक कर्जदरात होणार वाढ; हेक्टरी ८ हजार ५०० रूपयांची वाढ होणार

Sugarcane Farmers : शेतकऱ्यांची कर्ज खाती जास्त होत असल्यामुळे सुरू व खोडवा पिकासाठी सरासरी सव्वा लाख रुपये पीक कर्ज मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Season : जुलैनंतर हंगाम २०२५/२६ मध्ये ऊस पीक कर्ज दरात वाढ होणार आहे. हेक्टरी ५ टक्के वाढीचा निर्णय जिल्हास्तरीय पीक कर्ज कमिटीने निश्चित केला असून याबाबत शासनाला प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यानुसार आडसाली ऊस पिकासाठी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये, तर खोडवा उस पिकासाठी हेक्टरी ५ हजार ७५० रुपये पीक कर्जात वाढ करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांची कर्ज खाती जास्त होत असल्यामुळे सुरू व खोडवा पिकासाठी सरासरी सव्वा लाख रुपये पीक कर्ज मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

नाबार्डकडून पुढील हंगामामध्ये पीक कर्जाकरिता खेळते भांडवली कर्जदाराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हास्तरीय पीक कर्ज कमिटीने ५ टक्के कर्ज दरात वाढ सुचविली आहे. दरवाढीचा निर्णय राज्यपातळीवर, नंतर नाबार्डमध्ये होणार आहे. इंधन, खत व मजुरीचे वाढलले दर तसेच एकूण उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांतून पीक कर्ज दरात वाढ व्हावी, अशी मागणी होत होती.

याबाबत कोल्हापूर जिल्हा बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हास्तरीय कमिटीने पुढील हंगामासाठी ऊस पिकासाठी प्रतिहेक्टरी ५ टक्के वाढीव कर्जदर सुचविला आहे. दर शिफारस करून प्रस्ताव राज्याला पाठविला आहे. सरकारकडून पुढील आदेश आल्यानंतर अंमलबजावणी केली जाणार आहे. असे शिंदे यांनी माहिती दिली.

ऊस लागणीसाठी पीक कर्ज सुरुवातीला दिले जाते. लावन ऊस सुरुवातीला तुटतो. खोडवा हंगामाच्या शेवटी तुटतो. यामुळे संस्था पातळीवर ज्यादा खाती होतात. सुरू हंगामासाठी सुरू कर्ज, खावटी कर्ज व आकस्मित कर्ज, तसेच खोडवा पिकासाठी खोडवा कर्ज, खावटी कर्ज, आकस्मित कर्ज अशी सहा खाती, सहा वेगवेगळे पेमेंट दिले जाते.

यामुळे संस्था संगणकीकरणात अनेक अडचणी निर्माण होतात. तसेच शासनाला व्याज परतावा देण्यासाठी टप्पे करावे लागतात. यामुळे शेतकऱ्यांचा व संस्थेचाही मेळ बसत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT