AI Technology in Sugarcane : ‘एआय’आधारित ऊस शेती पाहण्याची संधी

Agricultural Innovation : वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ऊसशेती कालबाह्य होणार असून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसशेती शक्य आहे, हे बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने सप्रमाण सिद्ध केले आहे.
Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon
Published on
Updated on

Baramati News : वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ऊसशेती कालबाह्य होणार असून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसशेती शक्य आहे, हे बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने सप्रमाण सिद्ध केले आहे.

एक हजार शेतकऱ्यांच्या शेतातील उसावर हा प्रयोग करण्यात आला असून, त्याचे आश्‍चर्यकारक परिणाम समोर आले आहेत. राज्यात प्रत्येक ऊस उत्पादकाने या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असाच हा प्रयोग असून, ‘कृषिक २०२५’मध्ये देशभरातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षपणे पाहता येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी दिली.

Sugarcane Farming
AI in Sugarcane Farming : ऊस उत्पादन, उत्पादकतेसाठी एआयचा वापर करा : देवेंद्र फडणवीस

पारंपरिक शेती, शेतीतील परिपूर्ण माहितीचा अभाव यामुळे उत्पादन खर्च वाढला व उत्पादन घटले. आजमितीस प्रति एकर उसाचे सरासरी उत्पादन ३५ ते ४० टनांपर्यंत घसरले आहे. पर्यायाने ऊसशेती परवडत नाही व त्यांचे आर्थिक नुकसान होत असताना दिसत आहे. या स्थितीत हे तंत्रज्ञान वरदान ठरले आहे.

गुरुवारपासून (ता. १६) बारामतीनजीक असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्लॉटवर ‘कृषिक २०२५’ या कृषी प्रदर्शनांतर्गत ऊस उत्पादकांना हे तंत्रज्ञान पाहता येणार आहे. मायक्रोसॉफ्ट, ऑक्स्फर्ड विद्यापीठ व बारामतीचे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसशेती विकसित केली आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी या प्रदर्शनादरम्यान मिळणार आहे. याची माहितीही घेता येईल.

Sugarcane Farming
AI In Sugarcane : ऊस उत्पादनात एआय चा वापर

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून तसेच ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार व ‘ऑक्स्फर्ड’चे संचालक डॉ. अजित जावकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारला आहे.

राज्यभरातील १००० शेतकऱ्यांच्या शेतात ऊस शेतीमध्ये हवामान बदल, इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी), उपग्रह आधारित भौगोलिक प्रणाली (जीआयएस), मशिन लर्निंग अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात केला जात आहे.

ऊस शेतीमध्ये ‘एआय’ वापरातून होणारे फायदे

- उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ.

- उत्पादन खर्चात २० ते ४० टक्क्यांची घट.

- तीस टक्के पाण्याची बचत.

- रासायनिक खतांच्या वापरात २५ टक्के घट.

- कापणी कार्यक्षमतेत ३५ टक्क्यांपर्यंत सुधारणा.

- सातत्याने पीक निरीक्षणामुळे कीडकनाशकांच्या वापरात २५ टक्के बचत.

- जमीन सुपीकतेमध्ये वाढ. सेंद्रिय कर्ब मूल्यमापनाद्वारे भविष्यात शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा फायदा मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com