सातारा जिल्ह्यातील ऊस  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे डोळे दराकडे

Sugarcane Season : जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा गाळप सुरू होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक झाले आहेत. मात्र, किसनवार कारखान्यांचा अपवाद वगळता अजूनही कोणत्याही कारखान्याने दर जाहीर केलेला नाही.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा गाळप सुरू होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक झाले आहेत. मात्र, किसनवार कारखान्यांचा अपवाद वगळता अजूनही कोणत्याही कारखान्याने दर जाहीर केलेला नाही.

साखरेचे वाढलेले दर आणि उसाचे घटलेले उत्पादन यामुळे शेतकऱ्यांच्या या हंगामात चांगल्या दराची अपेक्षा लागून राहिली आहे. दरम्यान कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर करावा यासाठी सर्वच संघटनानी रविवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी गाळप हंगाम तयारी केली असून यापैकी बहुतांश कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांचे गाळप सुरू होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. यामध्ये किसनवीर कारखाने पहिली उचल २८०० रुपये जाहीर केली आहे. इतर कारखान्यांनी अजून दराबाबत कोणातही निर्णय जाहीर केलेला नाही.

साखरेचे दर ३९०० ते ४००० क्विंटलवर टेंडर निघत असल्याने शेतकऱ्यांना या हंगामात किमान ३३०० ते ३५०० रुपये पहिला हप्ता मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. शेतकरी संघटनांनी ३५०० पासून ५००० रुपयांची मागणी केली आहे. तसेच मागील हंगामातील उसाला ५०० पासून एक हजार रुपयांची मागणी केलेली आहे. साखरेचे वाढलेले दर व उसाचे घटलेले क्षेत्र यामुळे कारखानदारांना या दरम्यान दर द्यावा लागणार आहे.

दरासाठी संघटना आक्रमक

जिल्ह्यातील साखर कारखान्यानी दर जाहीर करावा यासाठी सर्वच शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. रविवारी अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहेत. दिवाळीमुळे संघटना शांत होत्या आता मात्र संघटना दरासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांनी दर जाहीर केल्याशिवाय आपला ऊस देऊ नये अथवा आंदोलनामुळे नुकसान झाल्यास संघटना जबाबदार राहणार नसल्याचेही संघटनाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

दरातही स्टेटस वार

जिल्ह्यातील एका खाजगी कारखान्यांकडून पहिली उचल ३३०० रुपये दिले जाणार असल्याचे स्टेटस फिरत आहे. त्या कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांकडून हा दर सांगितला जात आहे. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडून ऊस तोडला जात असून या कारखान्यांकडून पहिली उचल ३३०० ते ३५०० रुपये देणार अंतर्गत बोलले जात आहे. मात्र, अजुनही दर जाहीर केलेला नाही. दर जाहीर झाल्यावर हंगाम पूर्ण क्षमनेते सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT