Sugarcane Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : खानदेशात ऊसलागवडीला सुरुवात

Sugarcane Season 2024 : खानदेशात ऊसलागवडीला या महिन्यापासून सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वरूपातील बेणे वापर सुरू झाला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात ऊसलागवडीला या महिन्यापासून सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वरूपातील बेणे वापर सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे काही शेतकरी उसाची रोपे आणून त्यांची लागवड करीत असल्याचे दिसून आले आहे. खानदेशात पांढऱ्या माशीचा उद्रेक पाहता गेल्या दोन वर्षांत उसाची लागवड कमालीची खाली आली.

त्यातल्या त्यात चोपडा तालुक्यात हे प्रमाण निम्म्यावर आले आहे. अडावद, मंगरूळ व गलंगी, गणपूर गटात लागवड २० टक्क्यांवर आली आहे. सद्यःस्थितीला तालुक्यात एक हजार ६०० एकरांवर ऊस आहे. दोन वर्षांचा कालावधी गेल्यानंतर नवीन ऊस बेणे व रोपांची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे.

चांगल्या प्रकारचे दहा ते बारा महिन्यांचे बियाणे व ऊस रोपे नर्सरीमधून मागवून शेतकऱ्यांनी आता ऊस लागवडीला सुरुवात केली आहे. साधारणपणे दोन रुपये तीस पैशांपासून ते तीन रुपये पंचवीस पैशांपर्यंत वेगवेगळ्या वानांचे उसाची रोपे विविध नर्सरींमध्ये उपलब्ध झाली आहेत.

त्याचे बुकिंग करून शेतकरी आपल्या शेतामध्ये लावत असल्याचे दिसून आले आहे. खानदेशात जवळपास सर्वत्र चार फुटांची सरी सोडण्याची पद्धत आता रूढ झाली आहे. बेणे लागवडीसाठी एक डोळा, दोन डोळा, व तीन डोळे पद्धतीचा वापर शेतकरी करीत आहेत.

तर ऊस रोप दोन फुटांवर लागवड करून त्याला फुटवे आल्यावर त्यापासून चांगले उत्पादन येत असल्याचे आजपर्यंतचे अनुभव आहेत. पांढऱ्या माशीचा उपद्रव गेल्या दोन वर्षांत थोडाफार कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उसाकडे वळण्याची इच्छा दिसू लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT