Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यात पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता

Sugarcane Farming : शेतकरी संघटनेच्या भूमिकेकडे लक्ष
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon
Published on
Updated on

Sangali News : सांगली ः जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना फटका बसला असून, रब्बी हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच या पावसाचा परिणाम या वर्षीच्या गाळप हंगामाला बसणार आहे. परिणामी, या पावसामुळे यंदाचा गाळप हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसेच स्वामिभानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी गाळप हंगामाची जोरदार पूर्वतयारी केली आहे.

साखर कारखान्यांनी बॉयलर अग्निप्रदीपन केले आहे. १५ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी कारखान्यांना दिले आहेत. मात्र जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचून राहिले आहे. दलदल झाली आहे. पाणंद रस्त्यांची अवस्थाही अतिशय बिकट बनली आहे. त्यामुळे सततच्या पावसामुळे ऊस तोडणीसाठी परिस्थिती सध्यातरी नसल्याने साखर कारखान्यांकडून सांगितले जात आहे. सद्यःस्थितीला पाऊस थांबला तर किमान दीड महिन्यानंतर शेतात वाफसा येईल अशी आताची अवस्था आहे.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Season : सांगली जिल्ह्यातील गाळप हंगाम मध्यावर

कारखाना व्यवस्थापनाच्या नियोजनानुसार हंगाम चालू होण्यास फक्त १ महिना आहे. इथेच हंगाम १५ दिवस पुढे गेला आहे आहे. जिल्ह्यातील १८ साखर कारखाने आहेत. सध्या राजाराम बापू, साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी, तीपेहल्ली हुतात्मा, क्रांती, सोनहीरा, रायगाव, दत्त इंडिया, श्री श्री रविशंकर, दालमिया, शुगर, मोहनराव शिंदे आरग, विश्‍वास चिखली, यशवंत खानापूर, एसईझेड तूरची, उदगिरी श्रीपती शुगर डफळापूर या साखर कारखान्यांनी गाळपाची तयारी केली आहे. सन २०२४- २५ च्या गाळप हंगामात जिल्ह्यात १ लाख ३७ हजार १०३ हेक्टर उसाचे गाळप होणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद २५ ऑक्टोबरला आहे. या परिषदेत ऊस दराबाबत धोरण निश्‍चित केले जाणार आहे. त्यामुळे या परिषदेत काय निर्णय होणार आहे. तसेच साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय मान्य करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे ऊस दराच्या पहिल्या उचलीसाठी शेतकरी संघटनांचे आंदोलन होणार की हंगाम सुरू होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

तालुकानिहाय गाळप हंगाम २०२४-२५ करिता उपलब्ध होणारा ऊस क्षेत्र (हेक्टरमध्ये) दृष्टिक्षेपात

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com