Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : नंदुरबारमध्ये ऊस लागवड वाढली, पण दरांचे काय?

Sugarcane Market : गेल्या पाच वर्षांपासून खांडसरी तसेच कारखाने यांच्याकडून योग्य हमीभाव मिळत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून वेळोवेळी व्यक्त करण्यात आली आहे.

Team Agrowon

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात अनेक गावांतील असंख्य शेतकऱ्यांनी या वर्षीदेखील मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून खांडसरी तसेच कारखाने यांच्याकडून योग्य हमीभाव मिळत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून वेळोवेळी व्यक्त करण्यात आली आहे.

त्यामुळे या वर्षी तरी उसाला पुढील काळात योग्य हमीभाव जाहीर करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळा सुरू आहे. पुढे ऑक्टोबरमध्ये ऊसगाळप सुरू होईल. नंदुरबारात अधिकचे उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाची लागवड आपापल्या शेतात करीत असतात.

पपई, केळी आदी पिकांना पर्याय म्हणून तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांकडून उसाला प्राधान्य देण्यात येते. ऊस हे बारमाही पीक असून, त्याला मोठ्या प्रमाणात खत, उसाचे महागडे बियाणे, लागवडीचा खर्च, निंदणी, ठिंबक सिंचन आदी खर्च येतो.

त्यातच सर्वच क्षेत्रांमध्ये महागाई वाढलेली असून, याचा फटका शेतकऱ्यांनासुद्धा सहन करावा लागत आहे. रासायनिक खतांचे दर वाढले आहेत. एक हजार ५० रुपयांना मिळणारी बॅग आता एक हजार ७०० ते एक हजार ८०० रुपयांवर जाऊन पोचलेली आहे. त्यातच डिझेल, पेट्रोलचे दर वाढल्याने मशागतीचा खर्चदेखील दीडपटीने वाढला आहे.

कीटकनाशकांची तीच तऱ्हा आहे. असे असताना उसाला मिळणारा दर मात्र गेली कित्येक वर्षे एकाच जागेवरच अडकून पडला आहे. दरम्यान, लहरी हवामान, पाऊस, ढगाळ वातावरण आदी नैसर्गिक घटक अडचणीत वाढ करीत असतात. त्यातच शेतकऱ्यांनी भरपूर मेहनत घेऊन पिकविलेल्या शेतमालास योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी भरडला जात आहे. मात्र तरीदेखील शेतकरी बांधव न खचता आशेने, जोमाने शेतात राबत असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT