Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

Agriculture Department : यंदा मॉन्सून चांगला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यावर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon

Nashik News : यंदा मॉन्सून चांगला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यावर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. यंदा जिल्ह्यात खरिपासाठी ६ लाख २८ हजार ७०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली. खरीप हंगामासाठी खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन मंजूर झाले असून, ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.

मेचा तिसरा आठवडा सुरू होण्यापूर्वी शेतकरी, तसेच कृषी विभागास खरिपाचे वेध लागतात. त्यानुसार कृषी विभागाने आगामी खरीप हंगामासाठी तयारीला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांकडून पीक पेरणीसाठी शेतजमीन तयार करण्याचे काम जोमात सुरू आहे. गेल्या वर्षी ६ लाख २६ हजार १९० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती.

Fertilizer
Agriculture Fertilizer : बुलडाणा जिल्ह्यात खरिपासाठी १.७७ लाख टन खत मंजूर

यंदा यात वाढ झाली असून, ६ लाख २८ हजार ७०० हेक्टर क्षेत्र खरिपासाठी निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरा यंदा मक्याचा असेल. दोन लाख ४२ हजार हेक्टरवर मका, ९४ हजार हेक्टरवर भात, तर केवळ ६०० हेक्टरवर ज्वारीची पेरणी केली जाईल. याशिवाय, बाजरी ६१ हजार, नागली १६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. खरिपासाठी खते व बियाण्यांची मागणी करण्यात आली.

Fertilizer
Fertilizing Crop Method : पिकांना खत देण्याच्या विविध पद्धती

खासगी आणि सार्वजनिक अशी एकूण ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. ‘महाबीज’कडून पाच हजार ८५१ क्विंटलची मागणी नोंदविण्यात आली. सोयाबीनसाठी प्रस्तावित एक लाख २२ हजार हेक्टरकरिता एक लाख एक हजार ६६४ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात विभागात १० हजार क्विंटल बियाण्यांची खेप पोहोचेल, असे नियोजन आहे.

खतांची तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त

जिल्ह्यासाठी दोन लाख ६० हजार टन खतांची मागणी करण्यात आली होती. यापैकी दोन लाख २० हजार ६०० टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. यात युरिया ७६ हजार ९०० टन, डीएपी १८ हजार ३०० टन, तर ‘एसएसपी’च्या २६ हजार ५०० टनांचा समावेश आहे. खतांची तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पथके तयार करण्याची तयारी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com