Ravlgaon Sugar   Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : अजंग एमआयडीसी, रावळगाव शुगरमुळे पुनर्वैभव

Dada Bhuse News : चॉकलेट व साखरमुळे रावळगाव हा देशातील ब्रॅन्ड आहे. एस. जे. शुगर कंपनीने रावळगाव एस. जे. शुगर असे नामकरण करावे. साखर कारखाना व रावळगाव-अजंग औद्योगिक वसाहत गावाला पुनर्वैभव मिळवून देईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

Team Agrowon

Nashik News : चॉकलेट व साखरमुळे रावळगाव हा देशातील ब्रॅन्ड आहे. एस. जे. शुगर कंपनीने रावळगाव एस. जे. शुगर असे नामकरण करावे. टंचाईवर मात करतानाच पाण्याची बचत करून तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी.

तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, शेतकरी, नागरिक एस. जे. शुगर साखर कारखान्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. साखर कारखाना व रावळगाव-अजंग औद्योगिक वसाहत गावाला पुनर्वैभव मिळवून देईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

रावळगाव (ता. मालेगाव) येथील एस. जे. शुगर डिस्टिलरी आणि पावर प्रा. लि. कारखान्याचे गव्हाण पूजन व गळीत हंगाम शुभारंभ श्री. भुसे यांच्यासह साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते झाला, त्या वेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

माजी आमदार योगेश टिळेकर, कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड, उपाध्यक्ष दत्तात्रेय आंबेकर, भाजपचे नेते सुरेश निकम, मामको बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले, मविप्रचे चिटणीस दिलीप दळवी, विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे, शेतकरी नेते प्रा. के. एन. आहिरे, नरेंद्र सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप पवार, देवळा बाजार समितीचे भाऊसाहेब पगार, नरेंद्र आहिरे, कान्हू जाधव, नामदेवराव पाटील, दिलीप जाधव, शेखर पवार, कल्याण पाटील, राकेश पाटील, हरीआण्णा जाधव आदी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, रावळगाव हा खासगी क्षेत्रातील देशातील पहिला साखर कारखाना आहे. कारखाना व परिसरातील शेती सिंचनासाठी त्यावेळी चणकापूर धरण बांधले गेले. कारखान्याची साखर वितरित होण्यासाठी मनमाडला रेल्वे स्टेशन झाले. चॉकलेटमुळे जगभरात रावळगावचा नावलौकिक आहे. कारखाना पुन्हा सुरु झाल्याने स्थानिकांना रोजगार मिळाला ही आनंदाची बाब आहे.

कारखान्याला लागेल ते सर्व सहकार्य करू. जोपर्यंत मागील हंगामाचे शेतकऱ्यांचे उसाचे पैसे दिले जात नाहीत, तोपर्यंत पुढच्या हंगामास परवानगी दिली जाणार नाही असे शासनाचे धोरण आहे. राज्यातील ९९.१० टक्के कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे गेल्या वर्षाच्या उसाचे शेतकऱ्यांचे पैसे दिले आहेत.

रावळगाव-अजंग औद्योगिक वसाहतीत वर्षाअखेरीस आणखी ५० प्रकल्पांचे भूमिपूजन केले जाईल. रावळगाव कारखाना व औद्योगिक वसाहत रावळगावसह पंचक्रोशीच्या वैभवात भर घालेल. आगामी काळात पाण्याचे प्रकल्प होणार आहेत. नारपार प्रकल्पासंदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याचे संचालक कुंदन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सरव्यवस्थापक एस. के. भाकरे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष अरुण नरके यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT