Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : पुणे जिल्ह्यात दहा कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू

Sugarcane Crushing Started in Pune : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम मागील २० ते २२ दिवसांपासून सुरू झाला आहे. जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी असे एकूण जवळपास १८ साखर कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम मागील २० ते २२ दिवसांपासून सुरू झाला आहे. जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी असे एकूण जवळपास १८ साखर कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत.

त्यापैकी दहा कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. यात ‘बारामती अॅग्रो’ने ऊस गाळपात आघाडी घेतली असून चालू गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती साखर कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात उसाचे दर वर्षी उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टरवर उसाच्या लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे सव्वालाख हेक्टरवरील ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

शासनाच्या आदेशानुसार १ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू झाले आहेत. यामध्ये सहकारी ६ व खासगी ४ कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख २२ हजार टन एवढी असून आत्तापर्यंत ११ लाख ८७ हजार ४०३ टनाचे गाळप केले असून त्याद्वारे ९ लाख ४६ हजार २५५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

तर, साखर उतारा ७.९७ टक्के एवढा आहे. यंदाच्या गाळप हंगामात ऊस तोडणीसाठी तोडणी मजुरांऐवजी, ऊस तोडणी यंत्राचा वापर सुरू झाला आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी प्रातिनिधीक स्वरूपात कारखान्यातील गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगाम सुरू करत आहे.

परंतु प्रत्यक्षात कारखान्यांना साखर आयुक्त स्तरावरून अधिकृत परवाने दिल्यानंतर कारखाने सुरू होत आहे. त्यासाठी लागणारे परवाने साखर आयुक्त स्तरावरून ऑनलाइन दिले जात आहेत. पुणे जिल्ह्यातील बहुतांशी सर्व साखर कारखाने दिवाळीपूर्वी, दिवाळीनंतर सुरू झाले आहेत. त्यामुळे साखर कारखाना कार्यस्थळावर हळूहळू वर्दळ वाढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT