Sugarcane Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : देशातील ७७ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

Sugarcane Crushing : अपुऱ्या उसामुळे देशातील ७७ साखर कारखान्यांनी फेब्रुवारी मध्यापर्यंत अखेर आपला हंगाम समाप्त केला आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद होण्याचा वेग सर्वाधिक आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : अपुऱ्या उसामुळे देशातील ७७ साखर कारखान्यांनी फेब्रुवारी मध्यापर्यंत अखेर आपला हंगाम समाप्त केला आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद होण्याचा वेग सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी या कालावधीत केवळ २८ कारखान्यांनी हंगाम संपवला होता.

कर्नाटकातील ७९ कारखान्यांपैकी ३४ साखर कारखाने पूर्णपणे बंद झाले आहेत. कारखाने बंद होण्याचा वेग गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. कर्नाटकात गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्यापर्यंत अखेर केवळ पंधरा साखर कारखान्यांचा हंगाम संपला होता.

महाराष्ट्रातील २०० साखर कारखान्यांपैकी ३० साखर कारखाने बंद झाले आहेत. राज्यात गेल्या वर्षी महाराष्ट्रातील केवळ ७ कारखाने या कालावधीत बंद होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत कारखाने बंद होण्याचा वेग जवळ जवळ चौपट आहे. उत्तर प्रदेशात मात्र केवळ दोन साखर कारखानेच बंद झाले आहेत.

१५ फेब्रुवारीअखेर महाराष्ट्राने देशात साखर उत्पादनात अग्रेसर क्रमांक कायम ठेवला आहे. महाराष्ट्रात ६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले त्या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये ६३ लाख टन साखर तयार झाली. तर कर्नाटकात ३७ लाख टन साखरेची निर्मिती झाली.

गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत देशाची साखर निर्मिती २७ लाख टनाने कमी आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षीपेक्षा १० लाख टन, उत्तर प्रदेश, व कर्नाटक मध्ये ५ लाख टनांनी साखर निर्मिती घटली आहे. साखरेबरोबरच उताराही घटला आहे.

यंदा ९.०९ टक्के आहे, जो गेल्या हंगामात याच कालावधीत ९.८७ टक्के होता. महाराष्ट्रात व कर्नाटकात अंतिम टप्प्यात उसाची मोठी टंचाई जाणवत असल्याचे चित्र आहे. उसाच्या टंचाई बरोबरच उत्पादनातही सात ते दहा लाख टनापर्यंत घट होत असल्याने कारखान्यांना उद्दिष्टाएवढे गाळप करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. उत्पादन घटीचा तोटा ऊस उत्पादकांबरोबर कारखान्यांनाही होत आहे.

यंदा २७० लाख टन साखर निर्मिती शक्य

साखर उत्पादन घटीचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने फेब्रुवारीच्या मध्याअखेरीस ही कायम ठेवला आहे. यंदा २७० लाख टन साखर तयार होण्याची शक्यता संघाने वर्तवली आहे. गेल्या वर्षी ३१९ लाख टन साखर निर्माण झाली होती.

महाराष्ट्रात २६ लाख टन, उत्तर प्रदेशात १० लाख टन, कर्नाटकात बारा लाख टन साखर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादित होण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशचा हंगाम सर्वात शेवटी संपण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT