Sugarcane Variety : फुले १३००७ : कमी तुरा अन् अधिक साखर उतारा देणारी उसाची जात

Sugarcane Cultivation : सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली हंगामासाठी फुले ऊस १३००७ या मध्यम पक्वता गटातील जातीची शिफारस करण्यात आली आहे. या जातीचा ऊस मध्यम जाड, नागमोडी कांडी, फुटवे अधिक असणारा आहे. या जातीला उशिरा व अल्प प्रमाणात तुरा येतो.
Sugarcane Phule 13007 Variety
Sugarcane VarietyAgrowon
Published on
Updated on

डॉ. राजेंद्र भिलारे

Sugarcane Farming : मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातून २०२३ मध्ये अखिल भारतीय ऊस समन्वित योजनेच्या द्वीपकल्पीय विभागातून महाराष्ट्रासह इतर सात राज्यांसाठी फुले ऊस १३००७ ही जात प्रसारित करण्यात आली आहे. या जातीची निर्मिती फुले २६५ आणि कोएम ०२५४ या जातींच्या संकरातून करण्यात आली आला आहे.

ही जात ऊस व साखर उत्पादनात को ८६०३२ या जातीपेक्षा जास्त सरस आहे. या जातीचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असून क्षारयुक्त जमिनीत चांगली उगवण होते. उत्पादनक्षमता देखील चांगली आहे.

या जातीस उशिरा व अल्प प्रमाणात तुरा येतो. भारतीय ऊस संशोधन संस्थेतर्फे या नवीन जातीची शिफारस महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत लागवडीसाठी करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय चाचणी

  • राज्यस्तरीय चाचण्यांमध्ये फुले ऊस १३००७ जातीचे सुरू हंगामात हेक्टरी १२९ टन, पूर्वहंगामात १३६ टन, आडसाली १४७ टन आणि खोडवा उत्पादन हेक्टरी १२१ टन मिळाले.

  • साखर उत्पादन अनुक्रमे हेक्टरी १८.४४, १९.४०, २०.५३ आणि १७.१० टन मिळाले. हे ऊस उत्पादन तुलनात्मक जात को ८६०३२ पेक्षा सुरू, पूर्वहंगामी, आडसाली आणि खोडव्यामध्ये अनुक्रमे ८.७२, १३.००,९.१४ आणि ११.२२ टक्के आणि साखर उत्पादन ९.०५, १०.९८, ६.१० आणि १०.२५ टक्के अधिक मिळाले.

  • या जातीचे व्यापारी शर्करा प्रमाण सुरू, पूर्वहंगामी, आडसाली आणि खोडवा अनुक्रमे १४.२२, १४.१९, १३.९५ आणि १४.०२ टक्के मिळाले.

Sugarcane Phule 13007 Variety
Sugarcane Variety : उसाचा नवीन वाण : फुले ऊस १५००६

द्वीपकल्पीय विभागातील उत्पादन

  • अंतिम चाचणीमध्ये तामिळनाडू,कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ आणि महाराष्ट्र राज्यातील १२ ठिकाणी फुले ऊस १३००७ या जातीचे उत्पादन को ८६०३२, कोसी ६७१, कोएसएनके ०५१०३ या प्रचलित जातींपेक्षा अनुक्रमे ११.२२, २९.७० आणि १९.७८ टक्के अधिक मिळाले.

  • खोडव्याचे ऊस आणि साखर उत्पादन को ८६०३२ पेक्षा अनुक्रमे १०.८७ टक्के आणि १२ टक्के अधिक मिळाले. ही जात देशात १२ ठिकाणी साखर आणि ऊस उत्पादनात पहिली आली आहे.

Sugarcane Phule 13007 Variety
Sugarcane Variety: उत्तर प्रदेशात ‘लालकुज’ प्रतिबंधक दोन ऊस जाती विकसित

द्वीपकल्पीय विभागात अभ्यास

  • फुले ऊस १३००७ या जातीच्या उसाची कांडयापर्यंत सरासरी उंची, हेक्टरी संख्या आणि सरासरी वजन यांचा अभ्यास आणि सरासरी वजन यांचा अभ्यास करणात आला. यामध्ये फुले ऊस १३००७ या जातीच्या उसाचा सरासरी व्यास २.८० सेंमी मिळाला. हा व्यास को ८६०३२ पेक्षा अधिक दिसून आला आहे.

  • फुले ऊस १३००७ या जातीच्या उसाची उंची २६६ सेंमी मिळाली. ही उंची को ८६०३२ पेक्षा अधिक आहे. एका उसाच्या सरासरी वजनामध्ये फुले ऊस १३००७ जातीचे वजन १.५३ किलो मिळाले. हे वजन को ८६०३२ पेक्षा जास्त आढळून आहे.

वैशिष्ट्ये

  • कांड्यांचा रंग हिरवा, पाचट निघाल्यानंतर रंग पिवळसर हिरवा, उंच वाढणारी, शंक्वाकृती नागमोडी कांडी, मध्यम आकाराचा अंडाकृती डोळा, डोळ्यापुढे खाच नाही.

  • मध्यम रुंद, सरळ वाढणारी गर्द हिरवी टोकदार पाने, पानावर कूस नाही, पाचट सहज निघते.

  • सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली हंगामात लागवडीसाठी प्रसारित.

  •  ऊस मध्यम जाड, तोडणीस उशीर झाला तरी पोकळ पडत नाही, फुटवे अधिक प्रमाणात.

  •  खोडवा उत्तम, पाचट सहज निघते.

  •  लाल कुज व चाबूक काणी रोगास प्रतिकारक, शेंडे किडीस कमी प्रमाणात बळी.

  •  को ८६०३२ पेक्षा साखरेचे प्रमाण जास्त, तुरा उशिरा व अल्प प्रमाणात.

  •  पाण्याचा ताण अधिक काळ सहन करण्याची क्षमता.

- डॉ. राजेंद्र भिलारे, ८२७५४७३१९१,

(ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव,जि.सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com