Sugar Production Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : साखर उत्पादन घटण्याची शक्यता

Sugarcane Season : सांगली जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी फेब्रुवारीअखेर ७८ लाख टन उसाचे गाळप करून ८६ लाख १२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी फेब्रुवारीअखेर ७८ लाख टन उसाचे गाळप करून ८६ लाख १२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्यांचा सरासरी ११.०३ टक्केच साखरेचा उतारा या गळीत हंगामामध्ये मिळाला आहे.

यंदाच्या गाळप हंगामातील ‘राजारामबापू पाटील’चे जत व आरगचा ‘मोहनराव शिंदे’ या दोन साखर कारखान्यांचा गाळप संपला आहे. मागील तीन ते चार वर्षांतील साखरेचे उत्पादन लक्षात घेता यावर्षी साखर उत्पादनात एक लाख क्विंटलने घट होईल, असा प्राथमिक अंदाज साखर कारखान्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या १९ आहे. यापैकी नागेवाडी, माणगंगा, महांकाली, डफळे हे कारखाने बंद होते. त्यामुळे मागील तीन ते चार गळीत हंगामांत केवळ १५ कारखान्यांचेच गाळप चालू होते.

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांत उसाचे क्षेत्र वाढले होते. त्यामुळे साखरेचे उत्पादनही वाढले होते. मागील दोन वर्षांत विक्रमी उसाचे गाळप करून एक कोटीहून अधिक क्विंटल साखर उत्पादन झाले होते.

यंदा जिल्ह्यात १ लाख ३५ हजार ६८८ हेक्टवरील उसाच्या गाळपासाठी १६ साखर कारखाने सुरू झाले. सुरुवातीच्या टप्प्यात ऊसदराच्या आंदोलनामुळे ऊस हंगामास गती आली नाही. त्यानंतर ऊसदराचा तिढा सुटल्याने गाळप हंगाम गतीने सुरू झाला. फेब्रुवारीअखेर ७८ लाख टन उसाचे गाळप करत ८६ लाख ३२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

हंगामाच्या मध्यावर कारखान्यांनी अधिकाधिक ऊस गाळपावर भर दिला आहे. कुंडलच्या क्रांती कारखान्याने गाळपामध्ये आघाडी घेतली आहे. ‘राजारामबापू’चे सर्वोदय युनिट, वाटेगाव, विश्वास चिखली, हुतात्मा वाळवा या चार कारखान्यांचा उतारा १ टक्क्याच्या पुढे आहे. तर तासगावचा एस. जी. झेड हा साखर कराखान्याचे साखर गाळपात, उत्पादन कमी असून उताराही कमी आहे. दरम्यान, राजारामबापू पाटीलचे जत युनिट आणि आरग येथील मोहनराव शिंदे कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.

तीन ते चार वर्षांपूर्वी उसाच्या क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळे साखरेच्या उत्पादनात वाढ झाली होती. मात्र, यंदा अपुऱ्या पावसाचा फटका उसाच्या उत्पादनाला बसला आहे.

जिल्ह्यातील कारखानानिहाय गाळपाचे चित्र

कारखाना गाळप (टनांत) साखर उत्पादन (क्विंटल) उतारा (टक्के)

दत्त इंडिया, सांगली ७ लाख ४९ हजार ८ लाख ४२ हजार ११.३८

राजारामबापू पाटील, साखराळे ७ लाख ४६ हजार ८ लाख ६८ हजार ११.६५

विश्वास, चिखली ५ लाख ३६ हजार ६ लाख ४३ हजार १२.१२

हुतातमा, वाळवा ४ लाख ५३ हजार ५ लाख ६४ हजार १२.१६

राजारामबापू पाटील, वाटेगाव ४ लाख ६४ हजार ५ लाख ८१ हजार १२.५६

एसजीझेड, तासगाव १ लाख २० हजार ९० हजार ५.२९

राजारामबापू पाटील, तिपेहळ्ळी १ लाख ८४ हजार २ लाख ६ हजार १०.३१

सोनहिरा, वांगी ८ लाख ५३ हजार ९ लाख १३ हजार ११.८२

क्रांतिअग्रणी, कुंडल ९ लाख १३ हजार ९ लाख ५२ हजार ११.७९

राजारामबापू पाटील, कारंदवाडी ३ लाख ४८ हजार ४ लाख ३२ हजार १२.४२

मोहनराव शिंदे, आरग २ लाख ५५ हजार २ लाख ६८ हजार १०.६०

निनाईदेवी, कोकरूड ४ लाख ३५ हजार ५ लाख २२ हजार ११.७८

यशवंत, नागेवाडी १ लाख २२ हजार १ लाख ३२ हजार १०.६९

केन अॅग्रो, डोंगराई १ लाख २१ हजार २ लाख ११ हजार १०.२३

उदगिरी, पारे ५ लाख ५१ हजार ५ लाख ८४ हजार १०.६०

सद्‌गुरू, राजेवाडी ५ लाख ६३ हजार ५ लाख ९.२४

श्रीपती शुगर, डफळापूर २ लाख ९४ हजार ३ लाख २१ हजार ११.०७

एकूण ७८ लाख ०८ ८६ लाख ३२ हजार ११.०६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT