Sugar Production agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : राज्यातील साखर उत्पादन घटलं, ७२ लाख ३७ क्विंटलने कमी

Sugarcane Production : यंदाच्या ऊस गळीत हंगामात राज्यातील साखरेचे उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत तुलनेत ७२ लाख ३७ हजार क्विंटलने कमी झाले आहे.

sandeep Shirguppe

Sugar Production Maharashtra : यंदाच्या ऊस गळीत हंगामात राज्यातील साखरेचे उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत तुलनेत ७२ लाख ३७ हजार क्विंटलने कमी झाले आहे. शिवाय ऊस गाळपही ७४ लाख ३२ हजार मेट्रिक टनांनी कमी झाले आहे. राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी ऊस गळीत हंगामात आज अखेरपर्यंत एकूण ७९४.४८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले तर राज्यात आतापर्यंत एकूण ८०६.१५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

यंदाच्या गळीत हंगामात सहकारी व खासगी मिळून २०७ कारखाने सुरू झाले. अन्य १७ कारखाने यंदाच्या गळीत हंगामात सुरू होऊ शकले नाहीत दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चार कारखाने बंद अवस्थेत आहेत. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेपर्यंत ८६६.८५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. तसेच ८८०.४८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले होते.

यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत एकूण २०७ साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले आहे. यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. राज्याच्या साखर आयुक्तालयाने शुक्रवारी ऊस गळीत हंगामाची सद्यःस्थिती दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

दरम्यान, साखर उत्पादनात राज्यात कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली असून, या विभागातील आतापर्यंतचे साखर उत्पादन हे सर्वाधिक २०७.१९ लाख क्विंटल इतके झाले आहे. साखर उत्पादनात पुणे विभाग हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून, या विभागात आतापर्यंत १७४.७६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

कोल्हापूर विभागही पिछाडीवर

कोल्हापूर विभागात ऊस गाळप हंगाम जोमात सुरू असून, आतापर्यंत एक कोटी ९२ लाख टन ऊस गाळप करून दोन कोटी १६ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. विभागाचा ११.२६ टक्के साखर उतारा राहिला असून, सव्वादोन कोटी ऊस गाळप होईल, दरम्यान १५ एप्रिल पर्यंत हंगाम चालेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

विभागाचा सरासरी साखर उतारा ११.२६ टक्के राहिला आहे. यंदा जिल्ह्यासह राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आडसाली व पूर्व हंगामी उसाचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे पुढील हंगामात उसाचे क्षेत्र कमी होऊन साखर कारखान्यांना गाळप हंगाम उद्दिष्ट गाठण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. तसेच साखरेचे दरही वाढतील, असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT