Crop Area Expansion : फळे, भाजीपाला, फुलवर्गीय पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी शासनाचे प्रयत्न : डॉ. मोते

Dr. Kailas Mote : शासन फळे, भाजीपाला, फुलवर्गीय पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे मत राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी व्यक्त केले.
Dr. Kailas Mote
Dr. Kailas MoteAgrowon
Published on
Updated on

Akola News : अन्नधान्य उत्पादनावर अवलंबून न राहता फळे, भाजीपाला आणि फुल पिकांच्या लागवड तंत्रज्ञानासह प्रक्रिया आणि विपणनातूनच खरी समृद्धी लाभणार आहे. शासन फळे, भाजीपाला, फुलवर्गीय पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे मत राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी व्यक्त केले.

शाश्वत शेतीसाठी विदर्भातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील दोन दिवसीय शिवार फेरीची गुरुवारी (ता.२२) सांगता झाली. या समारोपीय सत्रप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासह विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे,

Dr. Kailas Mote
Agriculture Technique : दुष्काळात फळबागांना आधार ‘डीफ्युजर’ तंत्राचा

शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पंचभाई यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ भाजीपाला तज्ज्ञ डॉ. विजय काळे यांनी तर आभार जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी मानले.

Dr. Kailas Mote
Agricultural Infrastructure Funds : केवळ गुंतवणूक नव्हे, तर परिवर्तनाची वचनबद्धता

सर्वाधिक लोकसंख्याक असलेल्या आपल्या देशातील परिस्थितीबद्दल विचार अस्वस्थ करणारा आहे, असे मत महाराष्ट्र राज्य जलसंधारण परिषदेचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध जलतज्ञ विजयआण्णा बोराडे यांनी संशोधक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसमोर जलसंवर्धनाचे महत्त्व मांडताना व्यक्त केले.

उद्यानिकी क्षेत्रात शाश्वत शेती व्यवसायाचा मुलमंत्र असल्याचे सांगताना कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी लोकसंख्या आणि घटत जाणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता कौशल्याधारित स्वयंरोजगाराच्या वाटा शोधा शोधण्याचे आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com