Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

Sugar Mill Income Tax : केंद्र सरकारने ऊस उत्पादक व साखर उद्योगासाठी १० वर्षांत घेतलेल्या अनेक चांगल्या धोरणात्मक निर्णयांची माहिती इंदापूर येथे शनिवारी (ता. ४) पत्रकार परिषद देण्यात आली.

Team Agrowon

Pune News : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ऊस उत्पादकांच्या आर्थिक उन्नतीसाठी उसाच्या ‘एफआरपी’मध्ये भरघोस वाढ करून इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन देणारे धोरण राबविले आहे. तसेच देशातील साखर उद्योग प्राप्तिकरातून कायमचा मुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे,’’ असे

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारने ऊस उत्पादक व साखर उद्योगासाठी १० वर्षांत घेतलेल्या अनेक चांगल्या धोरणात्मक निर्णयांची माहिती इंदापूर येथे शनिवारी (ता. ४) पत्रकार परिषद देण्यात आली.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार अनेक वर्ष सत्तेत होते; परंतु त्या सरकारने इथेनॉल संदर्भात शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका स्वीकारली नाही. श्री. मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने इथेनॉलचे ५ वर्षांचे धोरण जाहीर केले. त्यामुळे सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण १२ टक्क्यांपर्यंत गेले आहे.

२०२५ पर्यंत हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. इथेनॉलमुळे साखर उद्योगाला सध्या सुमारे २१ हजार कोटी रुपये मिळत आहेत. मिश्रणाचे प्रमाण २० टक्क्यांच्या पुढे गेल्यास ही उलाढाल ५० हजार कोटींपेक्षा अधिक होणार आहे.’’

‘‘मोदी सरकारने ‘ऊस कायदा १९६६’ मध्ये बदल करून रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे. राज्यात सध्या ११७ साखर कारखाने इथेनॉल निर्मिती करतात. यामध्ये सहकारी ४०, खासगी-४२ व अल्कोहोलपासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या ३५ कारखान्यांचा समावेश आहे,’’ असेही श्री. पाटील म्हणाले.

‘केंद्राकडून शेतकऱ्यांना दिलासा’

‘‘केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सी हेवी मळीपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर ५६.२८ रुपये, बी हेवी मळीपासून उत्पादित इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर ६०.७३ रुपये, तर उसाचा रस, साखरेपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर ६५.६१ रुपये प्रमाणे वाढवून ऊस उत्पादकांना दिलासा देण्याचे काम केले,’’ असे श्री. पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Madha Electricity Project: माढ्यातील विजेच्या कामासाठी १.८८ कोटी मंजूर

Soybean Procurement: ‘पणन’च्या केंद्रांवर १ लाख क्विंटलवर सोयाबीन खरेदी

Wheat Sowing: सहा तालुक्यांमध्ये गव्हाचा सरासरीहून अधिक पेरा

Farm Loan Waiver: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे ४ हजार कोटींची थकबाकी

Turmeric Rate: हळद दरासाठी न्यायालयीन लढाईचा एल्गार

SCROLL FOR NEXT