Parbhani Hingoli News: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) अंतर्गत २५ केंद्रांवर शुक्रवार (ता.२६) पर्यंत हमीभावाने (प्रति क्विंटल ५३२८ रुपये) सोयाबीन विक्रीसाठी २४ हजार ७५१ ऑनलाइन शेतकरी नोंदणी आहे. या दोन जिल्ह्यांत २० केंद्रांवर ६ हजार ९४२ शेतकऱ्यांकडून १ लाख २८ हजार ५७१ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. १५ खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी केल्यापैकी ५९ हजार ५४७ क्विंटल सोयाबीनचे ३१ कोटी ७२ लाख ६९ हजार ८०० रुपयाचे चुकारे ३ हजार ५९८ शेतकऱ्यांना अदा करण्यात आले..परभणी जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी नाफेड (राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ) यांच्या ६ तालुक्यातील ९ खरेदी केंद्रावर शुक्रवार (ता. २६)पर्यंत ११ हजार ५३४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली..त्यापैकी ५ हजार ६३ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर संदेश पाठविण्यात आले. सर्व केंद्रांवर १ हजार ९६२ शेतकऱ्यांच्या ३६ हजार ६२५ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. त्यापैकी १३ हजार १७० क्विंटल सोयाबीन वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ व एनसीसीएफच्या (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) यांच्या ५ तालुक्यांत १६ खरेदी केंद्रांवर शुक्रवार (ता. २६) पर्यंत १३ हजार २१७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली..त्यापैकी ९ हजार ७१ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले. त्यापैकी ११ केंद्रावर ४ हजार ९८० शेतकऱ्यांचे ९१ हजार ९४६ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. त्यापैकी ४७ हजार ५६५ क्विंटल सोयाबीन वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आले..Soybean Procurement: सोयाबीनची आठ खरेदी केंद्रे वाढली.३१ कोटी ७२ लाख रुपयाचे चुकारे अदायगी...परभणी जिल्ह्यात खरेदी केलेल्या सोयाबीनची किंमत १९ कोटी ३६ लाख ५९ हजार ४८३ रुपये होते. .Soybean Procurement: सोयाबीन खरेदीचा गोंधळ कायम.झरी वगळता ८ केंद्रावर खरेदी केल्यापैकी१७ हजार ५७३ क्विंटल सोयाबीनचे ९ कोटी ३६ लाख ३१ हजार ६९८ रुपये चुकारे १ हजार १६० शेतकऱ्यांना अदा करण्यात आले..हिंगोली जिल्ह्यात खरेदी केलेल्या सोयाबीनची किंमत ४८ कोटी ९८ लाख ९० हजार ९५२ रुपये होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.