Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Solar Power Generation : वार्षिक एक लाख कोटींपेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या राज्याच्या साखर उद्योगाला सौरऊर्जा निर्मितीकडे नेण्याच्या हालचाली साखर आयुक्तालयात सुरू झाल्या आहेत.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Pune News : वार्षिक एक लाख कोटींपेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या राज्याच्या साखर उद्योगाला सौरऊर्जा निर्मितीकडे नेण्याच्या हालचाली साखर आयुक्तालयात सुरू झाल्या आहेत. नवे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार व साखर उपपदार्थ विभागाचे नवनियुक्त सहसंचालक अविनाश देशमुख यांच्याकडून सध्या ‘सौरऊर्जा निर्मितीत साखर उद्योगाला असलेला वाव’ या विषयाचा बारकाईने अभ्यास सुरू आहे. सौरऊर्जा निर्मितीची वाटचाल ठरविण्यासाठी लवकरच साखर आयुक्तालय, साखर उद्योग, महावितरण अशा मुख्य यंत्रणा एकत्रितपणे चर्चा करण्याची शक्यता आहे.

Sugar Factory
Sugar Industry : साखर कारखाने आर्थिक अस्थिरतेकडे

‘‘एक मेगावॉट सौरऊर्जा तयार करण्यासाठी साडेतीन ते चार एकर जमीन व चार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागेल. शासनाचे पाठबळ मिळाल्यास ते शक्य आहे. धाराशिवमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने सौरऊर्जा निर्मितीत यशस्वी पाऊल टाकलेले आहे. साखर कारखान्यांना सध्या खर्चिक बगॅस जाळून सहवीज निर्मिती करावी लागते. नव्या प्रकल्पांना ही वीज प्रतियुनिट केवळ ४.७५ रुपये ते ४.९९ रुपये मिळवून देते. त्या तुलनेत सौर वीज २.७० रुपये मिळवून देईल. परंतु त्यासाठी कच्चा माल लागणार नाही,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Sugar Factory
Sugar Industry : राज्य बँकेकडून साखर मूल्‍यांकनात १०० रुपयांची घट

साखर कारखान्यांनी बिगर हंगामात लागणारी वीज स्वतः सौर प्रकल्पात तयार केल्यास अधिकची सहवीज विकता येईल. त्यामुळे कारखान्यांचे तोटे कमी होऊ शकतील. यापूर्वीच्या नियमाप्रमाणे कारखान्यांना केवळ एक मेगावॉटपर्यंत सौर वीज विकण्यास मान्यता होती. आता मात्र पाच मेगावॉटपर्यंत मर्यादा वाढवली आहे. कमी जागा असलेले साखर कारखाने आपापल्या गोदामांवर, छतांवर, कर्मचारी वसाहतींवर सौर प्रकल्प बसवू शकतील. तसेच, मोठमोठे भूखंड असलेले कारखाने जमिनीवर मोठे सौरऊर्जा प्रकल्प उभारू शकतील. ही वीज पूर्णतः हरित असेल. त्यातून कारखान्यांची किमान ५-१० टक्के बचत झाली तरी तोटे कमी होतील, असा युक्तिवाद केला जात आहे.

साखर उद्योगाला सौरऊर्जा निर्मितीकडे नेण्याची संकल्पना स्वागतार्ह आहे. धाराशिवमध्ये डॉ. आंबेडकर साखर कारखान्याने पाच मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प दहा एकर क्षेत्रात उभा केला आहे. परंतु सर्व साखर कारखान्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जागा व गुंतवणुकीसाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले तरच सौरऊर्जेची दालनं साखर उद्योगाला उघडू शकतील.
पी. आर. पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com