Parbhani News: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत रब्बी हंगाम २०२५ मध्ये शुक्रवार (ता. २६) पर्यंत गव्हाची ६२ हजार ६३६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी, सोनपेठ व हिंगोली जिल्ह्यांतील हिंगोली, कळमनुरी, औंढानागनाथ, सेनगाव या ६ तालुक्यांमध्ये गव्हाची सरासरीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. थंड वातावरण गव्हासाठी पोषक ठरत आहे. पेरणीच्या कालावधीनुसार गव्हाचे पीक वाढीच्या, पोटऱ्यात, निसवलेल्या अवस्थेत आहे..परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ९७७ असतांना शुक्रवार (ता. २६)पर्यंत २ लाख ७८ हजार ९१४ हेक्टरवर (१०३.६२ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात गव्हाची ३४ हजार ९३४ पैकी २८ हजार ७७२ हेक्टर (८२.३६ टक्के), ज्वारीची ९७ हजार ४६४ पैकी ८३ हजार ७६३ हेक्टर (८५.९४ टक्के), मक्याची १ हजार ५०२ पैकी ४०० हेक्टर (२६.६५ टक्के) पेरणी झाली. .Wheat Sowing: जळगाव जिल्ह्यात गव्हाची ६५ हजार हेक्टरवर पेरणी.हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ३४ हजार ८४१ असताना १ लाख ६५ हजार ८६० (१२३ टक्के) पेरणी झाली. करडईची १ हजार ६०२ पैकी ६७४ हेक्टर (४२.०५ टक्के), जवसाची ५५.५४ पैकी १४ हेक्टर (२५.२१ टक्के), तिळाची ३२.२४ पैकी १० हेक्टर (३१.०२ टक्के) पेरणी झाली आहे..Wheat Sowing: खपली गव्हाची खानदेशात अल्प पेरणी.हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ६९ हजार २२० असताना १ लाख ८१ हजार ९६७ हेक्टरवर (१०७.५३ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र ३३ हजार ४६९ असतांना ३३ हजार ८६५ हेक्टर (१०१.१८ टक्के) पेरणी झाली. .ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ९ हजार ५६७ असताना १३ हजार ९६१ हेक्टर (१४५.९२ टक्के) मक्याची ८६७ पैकी ४२३ हेक्टर (४८.७३ टक्के)पेरणी झाली. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २१ हजार ६२ असतांना १ लाख ३१हजार ६३५ हेक्टर (१०८.७३ टक्के) पेरणी झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.