Sugarcane Rate FRP agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate FRP : शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे नेते ऊस उत्पादकांचा वाटा देणार का?

Sugar Factory Owners : शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून साखर कारखान्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे राजकारण करणाऱ्या एकाही लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊ वाटत नाही का?

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane Farmers : उस उत्पादक शेतकऱ्यांना ४०० रूपयाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार व शेतकरी संघटना प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४०० रूपये कसे मिळतात याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत हिशोबासह पटवून सांगितलं. परंतु जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याच्या प्रतिनिधीने याबाबत शब्द न काढता मौन धारण केले. यावर आता शेतकऱ्यांमध्ये संतापाचा सूर उमटत आहे.

शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून साखर कारखान्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे राजकारण करणाऱ्या एकाही लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊ वाटत नाही का? जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत साखर कारखान्यांचे अध्यक्ष आजी- माजी आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केला. हेच कारखानदार शेतकऱ्याचे आधारवड म्हणून भाषण करताना दिसतात परंतु एकाही लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊ वाटत नाही का? असा सवाल आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

२१ पैकी १९ कारखानदार गैरहजर

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणजे जिल्ह्यातील दोनच साखर कारखान्याचे चेअरमन या बैठकीला उपस्थित होते. बाकी जिल्ह्यातील १९ साखर कारखान्याच्या चेअरमननी या बैठकीकडे पाठ फिरवली. याच कारखान्याच्या माध्यमातून चेअरमनांचा वाढदिवस, जनरल मिटींग किंवा एखाद्या मंत्र्याची सभा असल्यानंतर हे गाड्या पाठवून देवून गर्दीचा महापूर करतात गावागावात बैठका घेतात मात्र शेतकऱ्यांना आपल्या उसाचा पैसा देण्याची वेळ या कारखानदारांवर येते तेंव्हा हेच कारखानदार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या दरासह उसापासून तयार होणाऱ्या उपपदार्थांचे दर जवळपास २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. यातून थेट फायदा हा साखर कारखान्यांना होत आहे. मात्र, ऊस उत्पादकांना याचा लाभ न देण्याची भूमिका साखर कारखाने चालकांची दिसून येत आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.

आत्मक्लेशमुळे कारखानदार जागे होणार?

१३ सप्टेबरला माजी खासदार राजू शेट्टी यांनी उसाला ४०० रुपये दुसरा हफ्ता द्या या मागणीसाठी साखर सहसंचालक कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला होता. परंतु १ महिना होऊनही साखर कारखानदार कोणतीही भूमिका

घेत नसल्याने शेट्टी यांनी गांधी जयंतीपासून ढोल बजाओ आंदोलन छेडले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना आणि साखर सहसंचालकांनाही निवेदन दिली जात आहेत. कारखान्यातून बाहेर जाणारी साखर तसेच ऊस तोडी रोखल्या जात आहेत. परंतु कारखानदार कोणतीच भूमिका घेत नसल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात १७ तारखेपासून सर्व कारखानदारांच्या दारात जात आत्मक्लेश आंदोलन करत कारखानदारांना ४०० देण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न राहणार आहे.

शेतकऱ्यांना वाटा देण्यास कारखानदारांची टाळाटाळ

मागच्या गत हगांमात प्रतिक्विंटल साखरेचा दर २९०० ते ३००० रुपयांपर्यंत होता. आता हाच दर ३८०० ते ३९०० रुपयांपुढे गेला आहे. याचा साखर कारखान्यांना निश्चितपणे फायदा होत आहे. मात्र, झालेल्या फायद्यात शेतकऱ्यांना वाटेकरू करून घेण्याची मानसिकता कोणाची दिसून येत नाही. काल झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे लागतील आणि दसरा- दिवाळी गोड होईल, अशी अपेक्षा होती.

परंतु लोकप्रतिनिधी आणि साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनीच या बैठकीकडे पाठ फिरवली पण जे प्रतिनिधी पाठवले होते त्यापैकी काहीजण ऐकूण घेण्यापलिकडे काहीही करू शकले नाहीत. यातून कारखाना चालक आणि लोकप्रतिनिधींबाबत लोकांचा आणि शेतकऱ्यांचा रोष वाढणार हे मात्र निश्चित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT