ZP Eductaion Agrowon
ॲग्रो विशेष

ZP School : कॉन्व्हेंट संस्कृतीच्या काळात जिल्हा परिषद शाळेची भरारी

Rural Education : विशेष म्हणजे कॉन्व्हेंट संस्कृतीच्या वाढत्या प्रस्थामुळे शासकीय शाळांच्या विस्थापनाचा हा काळ असताना त्यांच्या या शाळेत मात्र विद्यार्थी पटसंख्या १११ इतकी आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’, असा विचार साने गुरुजींनी दिला होता. विचारांचा हाच वारसा जपत विडूळ (ता. उमरखेड) नागेश मिरासे या शिक्षकाने उपक्रमशीलतेच्या बळावर मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे.

विशेष म्हणजे कॉन्व्हेंट संस्कृतीच्या वाढत्या प्रस्थामुळे शासकीय शाळांच्या विस्थापनाचा हा काळ असताना त्यांच्या या शाळेत मात्र विद्यार्थी पटसंख्या १११ इतकी आहे. विडूळमध्ये मिश्र वस्ती असलेल्या या भागाला आबादी असे म्हटले जाते. या परिसरात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने मजुरी कामावर जाणे आणि व्यसनाधीनता अशी समस्या होती.

आर्थिक गरजा भागविण्यासाठी पालकांसमवेत मुलेही कामावर जायची. त्यामुळे जिल्हा परिषदेची आबादी शाळा उजाड राहत होती. मुलेच नसल्याने शाळेच्या देखभालीकडेही साहजीकच दुर्लक्ष झाले. भिंती काळवंडलेल्या, दरवाजे, खिडक्‍या तुटलेल्या, परिसरात घाणीचे साम्राज्य अशी भयावह अवस्था होती.

जून २०२३ मध्ये या शाळेची सुत्रे नागेश मिरासे या शिक्षकाकडे आली. त्या वेळी ८५ पटसंख्या होती. परंतु हे विद्यार्थी देखील शाळेत फिरकत नव्हते. नागेश मिरासे यांनी पालकांशी संवाद साधत त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून विद्यार्थ्यांची पावले शाळेकडे वळण्यास सुरुवात झाली. याची दखल घेत मिरासे यांनी शाळा परिसरात सुधारणांवर भर दिला.

त्यासाठी मोठा निधी लागणार होता. परंतु इच्छा तिथे मार्ग असतो या विचाराप्रमाणे त्यांना पैशांच्या समस्येवर सामाजिक संस्थांचा तोडगा सापडला. अनेक संस्थांशी संपर्क साधत त्यांनी निधीची जुळवाजुळव केली. त्यातून शाळा परिसरात गट्टू बसविण्यात आले. खिडक्‍या, दरवाजे नव्याने लावण्यात आले.

मुला-मुलींसाठी स्वच्छतागृह, शालेय परसबाग तयार करण्यात आली. शाळेच्या बोलक्‍या भिंतीदेखील लक्ष वेधून घेतात. त्याही पुढे जात संगणक शिक्षणाची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. यातूनच वर्ग एक ते पाच पर्यंतच्या शिक्षणाची सोय असलेल्या या शाळेत उपक्रमशीलतेच्या परिणामी सर्व वर्गातील प्रवेश फुल्ल आहेत. विशेष म्हणजे खासगी शाळांकडे जाणाऱ्या पालकांनी देखील आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी या शाळेत घातले आहे.

ग्रॅंड मराठा फाउंडेशनकडून साडेचार लाख रुपयांची कामे या शाळेच्या परिसरात करण्यात आली. शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट, बेटर इंडिया या संस्थांकडून शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा पुरवठा होतो. पार्वती चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शाळेअंतर्गत नवोदय पूर्वतयारी करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना साह्य केले जाते. युरोपमधील एका महिलेने एका अनाथ मुलाला शिक्षणकामी दत्तक घेतले आहे. काही कुटुंबीयांना रोजगारासाठी शिवणयंत्र देण्यात आली. रोजगाराचे साधन उपलब्ध झाले त्याच्या परिणामी पालकांसमवेत कामाला जाणारी मुले शाळेच्या प्रवाहात आली.
- नागेश मिरासे, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, आबादी, विडूळ मो. ८४२१२३६१५९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT