Wild Animal Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal : भिवघरमध्ये पशुपक्ष्यांचे स्‍थलांतर रोखण्यात यश

Water Update : पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील नागरिक मेटाकुटीला आले असताना उष्म्यामुळे जंगलातील पशुपक्षीही बेजार झाले आहेत.

Team Agrowon

Mahad News : पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील नागरिक मेटाकुटीला आले असताना उष्म्यामुळे जंगलातील पशुपक्षीही बेजार झाले आहेत. दाण्या-पाण्यासाठी त्‍यांची वणवण होत असून महाड तालुक्यातील भिवघर येथील वनप्रेमी संस्थेकडून पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्‍था करण्यात आली आहे.

भिवघर हे गाव वनप्रेमी संस्था आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून वणवामुक्त झाले आहे. त्‍यामुळे गावातील जंगल बहरले असून पशुपक्ष्यांचा वावरही वाढला आहे. परंतु वाढत्‍या उष्म्यामुळे जंगलातील पशु-पक्ष्यांना भटकंती करावी लागते.

महाड तालुका दुर्गम आणि डोंगराळ तालुका असून पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्‍या आहेत. पशु-पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी वनप्रेमी व दानशूर व्यक्ती पुढे आल्‍या आहेत.

भिवघर गावातील किशोर पवार या तरुणांनी वनप्रेमी संस्थेच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना एकत्र केले आणि वन विभागाच्या सहकार्यातून गाव वणवामुक्त केले. गावात नव्याने वृक्ष लागवड करण्यात आली. यामुळे गावातील जंगल वाढले.

पर्यावरण रक्षणामुळे अनेकजण गावाला भेट देतात. यंदा संस्थेचे अध्यक्ष किशोर पवार यांनी स्वखर्चातून पहिला टँकर सुरू केला आणि अनेक दानशूर व्यक्ती पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी पुढे आल्या.

वनप्रेमी संस्थेला अनेक दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे. संस्थेचे सदस्यही उन्हातान्हात झटतात. पाणी मिळाल्याने पशुपक्षी स्थलांतरही थांबले आहे.
दीपक आंब्राळे, उपाध्यक्ष, वनप्रेमी संस्था

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ration Card e-KYC : दोन लाख ८७ हजारांवर लाभार्थी स्वस्त धान्यास मुकण्याची शक्यता

Boragaon Anjanpur Barrage : बोरगाव-अंजनपूर बॅरेजेच्या दुरुस्तीला चौदा कोटी

Sugarcane Crushing Season : कर्नाटकात जाणाऱ्या उसाबाबत तोडगा काढू

Punjab Flood: पंजाबमधील पूर संकट; केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहानांनी आढावा घेतला

Crop Insurance : सांगलीत ६३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT